कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांना विमा योजनेतून भरपाई द्यावी

शेतकरी, शेतमजुरांसाठी केंद्र सरकारने विमा योजना राबविल्या आहेत. त्याचा विमा हप्ता वसूल केला जातो. या योजनेअंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजुरांना विमा रक्कम मिळावी, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने केली आहे.
Farmers who have died due to corona should be compensated through insurance scheme
Farmers who have died due to corona should be compensated through insurance scheme

वर्धा : अपघाती किंवा आजारी मृत्यू झालेल्या शेतकरी शेतमजुरांसाठी केंद्र सरकारने विमा योजना राबविल्या आहेत. त्याचा विमा हप्ता वसूल केला जातो. या योजनेअंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजुरांना विमा रक्कम मिळावी, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने केली आहे.

भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे राजीव पालीवाल, केशव भक्ते, राजू झोरे, नितीन चोपडे, विनायक वानखेडे, विकास नासरे, प्रवीण मुक्तेवर, देवेंद्र पालीवाल, उमेश यावले, दिलीप ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. बारा रुपये वार्षिक हप्ता भरून जीवन सुरक्षा तर ३३० रुपये वार्षिक भरणा करून जीवन ज्योती विमा योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकांकडून वरील विमा योजनांचा विमा हप्ता शेतकऱ्यांच्या किंवा खातेदाराच्या बँक खात्यातून विमा कंपनीला पाठविला जातो. दरवर्षी हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपये प्रीमियम म्हणून कंपन्यांकडे वळते होतात. पण विम्याचा लाभ मात्र मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे.

अपघाती मृत्यू झाल्यास जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत दोन लाख तर आजाराने मृत्यू झाल्यास जीवन ज्योती योजनेतून दोन लाख रुपयांचा विमा दावा मिळणे अपेक्षित आहे. कोरोना विषाणूजन्य रोग आहे. या रोगात अपघातात प्रमाणेच अचानक मृत्यू होतो. कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण होते. बरेचदा संबंधित बँक कोणत्या विमा कंपनीकडून विमा काढला ही माहिती देत नाही. तसेच मृत्यू दावा कसा व कोठे सादर करावा हे सांगत नाही. विमा हप्ता वसूल करण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या बँका विमा दावा मिळवून देण्यास उत्साही राहत नाही.

परिणामी शेतकरी विमा लाभापासून वंचित राहतात. शेतकरी दिवस-रात्र शेतात काम करतात. शेतकऱ्यांना अपघातात सोबतच कोरोना संसर्ग होण्याची शक्यता राहते. कोरोना झाल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे किंवा वेळेवर आरोग्यसेवा न मिळाल्यास शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. आतापर्यंत कारंजा (घाडगे) तालुक्यातील ५० ते ६० शेतकऱ्यांचा आपत्कालीन आजारामुळे मृत्यू झाला आहे. याची दखल घेत विमा भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com