मॉन्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण 

दोन दिवसांपासून श्रीलंका, मालदीव व कोमोरीन भागात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. पोषक वातावरण असल्याने मॉन्सूनने बऱ्याच भागात प्रगती केली आहे.
monsoon
monsoon

पुणे : दोन दिवसांपासून श्रीलंका, मालदीव व कोमोरीन भागात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. पोषक वातावरण असल्याने मॉन्सूनने बऱ्याच भागात प्रगती केली आहे. आज (ता. २९) आणि उद्या (ता.३०) मॉन्सून आणखी काही भागांत पुढे सरकून सोमवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले यास चक्रीवादळ शमले असून ते बिहार व उत्तर प्रदेशाच्या दिशेने सरकले आहे. शुक्रवारी दुपारी त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, वाऱ्याचा वेगही चांगलाच कमी झाला आहे. त्याचा काही प्रमाणात विदर्भावर परिणाम झाल्याने महाराष्ट्राच्या भूपृष्टावर असलेले हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. त्यामुळे राज्यात सध्या हवामान कोरडे असले तरी काही भागात उन्हाचा चटका अधिक आहे. तर दुपारनंतर काही भागात ढग भरून येत असून तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. 

अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेगाने सरकत मॉन्सूनने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. राजस्थानच्या वायव्य भागात व परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मध्य प्रदेशच्या आग्नेय भागातही चक्रिय वाऱ्याची स्थिती असल्याने मॉन्सूनला केरळात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण बनत असल्याने सोमवारी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू सरकत गोवा, तळ कोकण व महाराष्ट्रात दाखल होईल. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com