नांदेड जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ‘पन्नास’च्या खाली

नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजरी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी जाहीर केली होती. यात जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर झाली. त्यानंतर बुधवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर झाली.
Final in Nanded district The percentage is below fifty
Final in Nanded district The percentage is below fifty

नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजरी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी जाहीर केली होती. यात जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर झाली. त्यानंतर बुधवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावात आठ लाख ५४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा आठ लाख १९९ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी नजरी पैसेवारीवरुन व्यक्त करण्यात आला होता. यात आठ तालुक्यांची पैसेवारी पन्नासपैशापेक्षा अधिक, तर उर्वरित आठ तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाली होती. 

दरम्यान, सुधारित अंदाज ३१ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाला. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. यानंतर बुधवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर करून जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शासनाकडून नुकसानग्रस्तांसाठी सोयी सुविधा लागू होणार आहेत. या सोबतच कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणेच्या सयुक्तिक पद्धतीने घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी (कंसात गावांची संख्या )

नांदेड ४७ (८८), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४७ (१२६), लोहा ४५ (१२७), भोकर ४९ (७७), मुदखेड ४८ (५५), हदगाव ४८ (१३७), हिमायतनगर ४७ (६४), किनवट ४६ (१९१), माहूर ४६ (९२), देगलूर ४८ (१०८), मुखेड ४८ (१३५), बिलोली ४८(९१), नायगाव ४७ (८९), धर्माबाद ४८ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरिकरण झाले आहे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com