वाळु प्रकरणात साडेसोळा लाखांचा दंड

वरुड, अमरावती : उपविभागीय अधिकारी यांनी जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रकमालकांविरुद्ध अंतरिम आदेशानुसार तब्बल १६ लाख ५७ हजार १९८ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वाळु प्रकरणात साडेसोळा लाखांचा दंड
A fine of Rs 16.5 lakh in sand case

वरुड, अमरावती : उपविभागीय अधिकारी यांनी जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रकमालकांविरुद्ध अंतरिम आदेशानुसार तब्बल १६ लाख ५७ हजार १९८ रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची २५ टक्के रक्कम भरून सर्व ट्रक सोडण्यात आले आहेत. अंतिम आदेशात ही रक्कम वाढविली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  शासनाच्या नियमानुसार, रात्री किंवा पहाटेच्या सुमारास गौणखनिजाची वाहतूक किंवा नदीपात्रातून गौणखनिज काढण्यास मनाई असतानासुद्धा वरुड तालुक्यासह मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात आहे. या वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत होते. याविरुद्ध स्थानिक प्रशासनाने मौन धारण केले असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले होते.  या वाळू माफियांविरुद्ध कुणीच कारवाई करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकसुद्धा त्रस्त असल्याने ओरड वाढली होती. अशा परिस्थितीत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी स्वत: पुढाकार घेऊन गेल्या महिन्यात विविध ठिकाणांहून ७ ट्रक ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली होती.  या सातही ट्रक मालकांविरुद्ध उपविभागीय अधिकारी होंगोले यांनी दंडाची कारवाई केली असून तब्बल १६ लाख ५७ हजार १९८ रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.  उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा अंतरिम आदेश दिला असून अंतिम आदेशात दंडाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व ट्रकमालकांकडून २५ टक्के दंडाची रक्कम भरून ट्रक सोडण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.