पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे सोमवारी(ता.१४) पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे सोमवारी(ता.१४) पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री. खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. पैलवानांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. पै. खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन झाल्याचे समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदकेसरी जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली! श्री. खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या. त्यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली. शोक संदेश.. कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावून महाराष्ट्राचे नाव कोरले. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने राज्याच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.  - उपमुख्यमंत्री अजित पवार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com