चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन सुटले

गणपूर, जि. जळगाव: हतनूर धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाण्याचे पहिले आवर्तन चोपडा तालुक्यातील शिवारात पोहोचले.
 first rotation of Hatnur is released in Chopda taluka
first rotation of Hatnur is released in Chopda taluka

गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाण्याचे पहिले आवर्तन चोपडा तालुक्यातील शिवारात पोहोचले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठीची धामधूम शिवारात दिसून येत आहे. 

हतनूरचे पाणी पोचणारा चोपडा हा शेवटचा तालुका आहे. गलवाडे शिवारापासून या कालव्याच्या दोन उपवितारिका आहेत. तालुक्यातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावरील पिकांसह विहिरी व कूपनलिकांना या पाण्याचा लाभ होतो. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारीसह चारा पिकांना या पाण्याचा लाभ होत असल्याचे शाखा अभियंता पी. बी. पाटील यांनी सांगितले. 

चोपडा तालुक्यातील धानोरा, अडावद, वटार, सुटकार, वरडी, खर्डी, लोणी, पंचक, माचला, मंगरूळ, निमगव्हाण, सनपुले, खेडीभोकरी, गरताड, वेले, आखतवाडे, चोपडा, चहार्डी, काजीपुरा, गलवाडे, अनवरदे, बुधगाव, घोडगाव, हातेड बुद्रूक, हातेड खुर्द, भारडू आदी शिवारात हतनूर धरणाचे पाणी पोहचते.

या धरणाच्या पाण्यामुळे रब्बी हंगामाला यंदा लाभ होईल, अशी स्थिती आहे. कारण, पाणी वेळेत पोचले आहे. शिवाय कालव्यानजीकच्या शिवारातील कूपनलिकांचे पुनर्भरणही करता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com