मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ३८ लाख ६० हजार टन ऊस गाळप

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ३८ लाख ६० हजार टन ऊस गाळप
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ३८ लाख ६० हजार टन ऊस गाळप

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड यांसह खानदेशातील जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. ३ जानेवारीअखेर या कारखान्यांनी ३८ लाख ६० हजार ६०३.५७ टन उसाचे गाळप करताना ३७ लाख ४० हजार ३६७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.६९ टक्‍के राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना ५, बीड ७, जळगाव २ व नंदूरबार जिल्ह्यांतील ३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील २ सहकारी व ३ खासगी अशा एकूण पाच साखर कारखान्यांनी ३ जानेवारी अखेरपर्यंत ७ लाख ४० हजार १० टन उसाचे गाळप करत ९.८३ टक्‍के साखर उताऱ्याने ७ लाख २७ हजार १३५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जालना जिल्ह्यातील ३ सहकारी व २ खासगी साखर कारखान्यांनी ९ लाख ७६ हजार ४६९ टन उसाचे गाळप करताना ९ लाख ८७ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.१२ टक्‍के राहिला. बीड जिल्ह्यातील ५ सहकारी व २ खासगी साखर कारखान्यांनी १५ लाख ३६ हजार ६१८ टन उसाचे गाळप करत ९.५३ टक्‍के साखर उताऱ्याने १४ लाख ६४ हजार ९७५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. 

नंदूरबार जिल्ह्यातील २ सहकारी व १ खासगी साखर कारखान्याने उस गाळपात सहभाग नोंदविताना ४ लाख २० हजार ८१९ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ९.३५ टक्‍के सरासरी उताऱ्यानुसार ३ लाख ९३ हजार ३६२ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एक सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. या दोन्ही साखर कारखान्यांनी १ लाख ८६ हजार ६८५ टन उसाचे गाळप करताना ८.९४ टक्‍के साखर उताऱ्यानुसार १ लाख ६६ हजार ९२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सात कारखान्यांचे क्षमतेपेक्षा अधिक गाळप  मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २२ पैकी केवळ ७ कारखान्यांनी ३ जानेवारीला दैनिक क्षमतेच्या पुढे जावून ऊस गाळप केले. यामध्ये बीडमधील २, जालन्यातील ४ व औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ एका साखर कारखान्याचा समावेश होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com