पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे शासनाचे दुर्लक्ष

मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या प्रमाणानुसार पुराचा धोकाही वाढला आहे. मात्र, त्याचा शासकीय पातळीवर तितक्या गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. कोयनेसह मोरणा नदीच्या काठावरील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे शासनाचे दुर्लक्ष
Flood in Patan taluka Government's disregard for danger

मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या प्रमाणानुसार पुराचा धोकाही वाढला आहे. मात्र, त्याचा शासकीय पातळीवर तितक्या गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. कोयनेसह मोरणा नदीच्या काठावरील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विस्तारित होणारे पात्र नदीकाठच्या गावांना धोकादायक ठरते आहे. मात्र, तरीही शासकीय पातळीवर नदीकाठावरील संरक्षक भिंतींच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. 

महापुराच्या धोक्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात नदीकाठी संरक्षक भिंतींच्या कामांना प्राधान्याने गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील कोयनेसह मोरणा नदीकाठी बहुतांशी गावे वसली आहेत. नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक आपत्तीमध्ये दरवर्षी वाहून शेतीचे नुकसान होत आहे. तर, पूर परिस्थितीमध्ये विस्तारित होणाऱ्या पात्रामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. 

महसूल विभागाने या बाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने हा विषय आजही प्रलंबित आहे. नदीच्या तीरावर असलेली लाल माती ही पाटण तालुक्याची ओळख आहे. या लाल मातीचे कोणत्या ना कोणत्या कारणाने विद्रुपीकरण सुरू आहे. विकासाच्या नावाखाली माती उत्खनन होत असल्याचे विदारक चित्र आजही येथे पाहण्यास मिळत आहे. मोरणा विभागातील मोरणा नदीकाठी ‌मोरणा-गुरेघर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली आहे. 

  शेतकरी हतबल 

दरवर्षी पावसाळ्यात कोयना आणि मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शेती, कृषिपंपांचे नुकसान होत असल्याने‌ शेतकरी हतबल झाला आहे. तर, पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती व दगड, गोटे याचा भराव शेतात जाऊन शेती नापिक झालेली आहे. नदीकाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये दरवर्षी जमीन वाहून शेतीचे नुकसान होते. पूर परिस्थितीमध्ये विस्तारित होणाऱ्या पात्रामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होत आहे.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com