खानेदशातील अतिवृष्टिग्रस्तांना लवकरच मिळणार भरपाई

जळगाव ः खानदेशात अतिवृष्टीने पिकांची मोठी हानी झाली. पंचनामे झाले. मदतीची घोषणा शासनाने केली, पण मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जात नव्हता. हा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.
To the flood victims in Khanadesha Compensation will be given soon
To the flood victims in Khanadesha Compensation will be given soon

जळगाव ः खानदेशात अतिवृष्टीने पिकांची मोठी हानी झाली. पंचनामे झाले. मदतीची घोषणा शासनाने केली, पण मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जात नव्हता. हा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण लवकरच केले जाईल, अशी माहिती आहे. 

खानदेशात सुमारे पाच लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती. पण नुकसानीच्या टक्केवारीत अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांना मोठा फटका अतिवृष्टीत बसला होता. उडदाचे ७३ टक्क्यांवर, मुगाचे ८० टक्के, सोयाबीनचे काही भागात ६५, तर काही भागात ८० टक्के नुकसान झाले. कापसाचे नुकसानही ५० टक्क्यांवर झाले.

मध्यंतरी जळगाव जिल्ह्यात मदतनिधी प्राप्त झाला. तो अपुरा होता. त्याचे वितरण ९३ टक्के झाले. आणखी निधी प्राप्त झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सुमारे ६० कोटींवर निधीची गरज आहे. हा निधी काही तालुक्यांना मिळाला नाही. काही तालुक्यांना मिळाला, अशी स्थिती आहे. 

बोंड अळीची भरपाई द्या 

मागील सरकारने कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने नुकसान केल्यासंबंधी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतनिधी दिला होता. या सरकारने गुलाबी बोंड अळीबाबत पंचनामे केले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबतही पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगावात अडीच लाख नुकसानग्रस्त शेतकरी

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. तर धुळे व नंदुरबारात सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. कापसाच्या नुकसानीपोटी अधिकची भरपाई दिली जाईल. यातील २० टक्के नुकसानग्रस्तांना मध्यंतरी भरपाईसंबंधी मदतनिधी मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com