बीडमध्ये बाजरी, उडीद, मूग, हरभरा, सोयाबीन आवकेत चढ-उतार

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात बाजरी, उडीद, मूग, हरभरा, सोयाबीन, मका, तुरीच्या आवकेत चढ-उतार राहिला. सोयाबीनचे सरासरी दर ५९७३ रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढेच राहिले. तर, मक्याची आवक अगदीच नगण्य राहिली.
Fluctuations in millet, urad, green gram, gram, soybean import in Beed
Fluctuations in millet, urad, green gram, gram, soybean import in Beed

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात बाजरी, उडीद, मूग, हरभरा, सोयाबीन, मका, तुरीच्या आवकेत चढ-उतार राहिला. सोयाबीनचे सरासरी दर ५९७३ रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढेच राहिले. तर, मक्याची आवक अगदीच नगण्य राहिली.

बीड बाजार समितीमध्ये १३ ते १८ डिसेंबर दरम्यान बाजरीची एकूण आवक २२० क्‍विंटल झाली. २० ते ५० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी १८२६ ते २०११ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. उडदाची एकूण आवक ४०० क्‍विंटल झाली. १९ ते ८२ क्‍विंटल दरम्यान आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ५११७ ते ६९६५ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. हरभऱ्याची एकूण आवक २३ क्‍विंटल झाली. ४ ते ११ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३७७१ ते ४३५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मुगाची एकूण आवक ८७ क्‍विंटल झाली. ३ ते २७ क्‍विंटल दरम्यान आवक झालेल्या मुगाला सरासरी ५४२८ ते ६०२७ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची एकदम नगण्य म्हणजे केवळ दोन वेळा मिळून १६ क्‍विंटल आवक झाली. अनुक्रमे ४ व १२ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला सरासरी १७०० ते १७९१ रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. तुरीची एकूण आवक ८५ क्‍विंटल झाली. ५ ते ३९ क्‍विंटल दरम्यान आवक झालेल्या तुरीला सरासरी ४७०० ते ५७२८ रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. सोयाबीनची आठवडाभरात सर्वाधिक ८५६ क्‍विंटल आवक झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com