नांदेडमध्ये ३३ मंडळांत फळपिक विमा लागू

नांदेड : अंबिया बहारासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजना जिल्ह्यातील ३३ मंडळांत लागू केली आहे. नांदेडमध्ये केळी, आंबा व मोसंबी या फळपिकासाठी विमा योजना लागू केली आहे.
Fruit crop insurance implemented in 33 circles in Nanded
Fruit crop insurance implemented in 33 circles in Nanded

नांदेड : अंबिया बहारासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजना जिल्ह्यातील ३३ मंडळांत लागू केली आहे. नांदेडमध्ये केळी, आंबा व मोसंबी या फळपिकासाठी विमा योजना लागू केली आहे.

यात केळी व मोसंबीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. तर, आंब्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. १५) मुदत आहे. यामुळे इच्छूक शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतंर्गत अंबिया बहारासाठी सन २०२० हंगामात केळी, आंबा व मोसंबी या फळपिकासाठी लागू केली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, हदगाव, लोहा, मुदखेड, नायगाव, कंधार, मुखेड, उमरी, किनवट आणि नांदेड या तालुक्यातील ३३ मंडळांत ही विमा योजना लागू झाली आहे. 

केळीसाठी नियमित विमा संरक्षित रक्कम एक लाख ४० हजार, गारपीट ४६ हजार ६६७ रुपये आहे. यात नियमितसाठी सात हजार, तर गारपीटसाठी दोन हजार ३३३ रुपये विमा हप्ता आहे. आंब्यासाठी विमा संरक्षित रक्कम नियमितसाठी एक लाख ४० हजार, गारपीटसाठी ४६ हजार ६६७ रुपये आहे. तर, विमा हप्ता नियमितसाठी सात हजार, गारपीटसाठी दोन हजार ३३३ रुपये आहे. मोसंबीसाठी विमा संरक्षीत रक्कम नियमितसाठी ८० हजार, गारपीटसाठी २६ हजार ६६७ रुपये आहे. तर, विमा हप्ता रक्कम नियमितसाठी चार हजार, तर गारपीटसाठी एक हजार ३३३ रुपये आहे.   

तालुकानिहाय मंडळांतील फळपिके

केळी ः तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी (ता. नांदेड). अर्धापूर, दाभड, मालेगाव (ता. अर्धापूर), मुदखेड, मुगट, बारड (ता. मुदखेड). शेवडी बा. (ता. लोहा). हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी (ता. हदगाव). भोकर (ता. भोकर). मरखेल व हाणेगाव (ता. देगलूर). किनवट, इस्लापूर, शिवणी, बोधडी (ता. किनवट). उमरी (ता. उमरी). बरबडा (ता. नायगाव).

आंबा ः दाभड व मालेगाव (ता. अर्धापूर). कंधार (ता. कंधार). मुक्रमाबाद (ता. मुखेड).

मोसंबी - मालेगाव (ता. अर्धापूर). लिंबगाव व विष्णुपुरी (ता. नांदेड). (बारड ता. मुदखेड) 

जिल्ह्यातील अधिसुचित मंडळात लागू असलेल्या फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी मुदतीत फळपिक विमा योजनेत सहभाग घ्यावा. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com