एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीम

एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिस कॉल मोहीम राबविण्यात येणार आहे.
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’

कोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे करण्याबाबत राज्यांकडून म्हणणे मागवले आहे, पण त्याला महाराष्ट्राने विरोध केला नाही. याचा अर्थ राज्य सरकार ही ‘एफआरपी’चे तुकडे करण्याला संमती दाखवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही हे खपवून घेणार नाही. एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने १२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिस कॉल मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी असे वाटत असेल, त्यांनी त्या क्रमांकावर मिस कॉल करावेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत केले श्री शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारच्या वतीने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत म्हणणे मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने यास विरोध केला नाही. शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातील पक्षही एकरकमी एफआरपीबाबत मौन बाळगून आहेत. एफआरपीचे तुकडे केल्यास राज्यभरातील ऊस उत्पादक संकटात येणार आहेत. एफआरपीच्या तुकड्याच्या विरोधात आम्ही लढा उभारणार आहोत. यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कालावधीत मोहिमेमध्ये भाग घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन शेट्टी यांनी या वेळी केले. १२ तारखेपासून 8448183751 ८४४८१८३७५१ या क्रमांकावर शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावेत, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले. या वेळी जालिंदर पाटील यांच्यासह स्वाभिमानाचे पदाधीकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com