अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २०० कोटींचा

अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययात ५० कोटी ७६ लाख रुपयांची वाढ करण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी २०० कोटी रुपयांच्या नियतव्यय आराखडा झाला आहे.
General plan outlay of Akola is 200 crores
General plan outlay of Akola is 200 crores

अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययात ५० कोटी ७६ लाख रुपयांची वाढ करण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी २०० कोटी रुपयांच्या नियतव्यय आराखडा झाला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२४) आढावा बैठक झाली. ओमायक्रॉन विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. पालकमंत्री बच्चू कडू, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, कैलास देशमुख, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले उपस्थित होते.

जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १४९ कोटी २४ लाख रुपयांच्या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. त्यात विविध यंत्रणांनी प्रस्तावित केल्यानुसार वाढीव निधीची मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात वाढ करण्यात आलेल्या विकास घटकांमध्ये पाणंद रस्ते विकास, पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम, शाळांसाठी नवीन खोल्या, शौचालये बांधकाम आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यावर पवार यांनी ५० कोटी ७६ लाख रुपयांच्या वाढीव नियतव्ययास मंजुरी देण्याचे घोषित केले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com