आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या ग्रामपंचायत! 

आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या दोन्ही गावांना विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा किंवा नजीकच्या वघाळा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावांचा समावेश करावा.
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या ग्रामपंचायत!  Give our village a Gram Panchayat Gram Panchayat!
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या ग्रामपंचायत!  Give our village a Gram Panchayat Gram Panchayat!

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या दोन्ही गावांना विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा किंवा नजीकच्या वघाळा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आरमोरी पंचायत समितीसमोर चक्का जाम आंदोलन केले. पंधरा दिवसांच्या आत या संदर्भात निर्णय न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.  तत्कालीन गट ग्रामपंचायत औरसोडामधील परसोडा हे गाव फार मोदी नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु त्याच गट ग्रामपंचायतमधील रवी, मुल्लुरचक ही गावे नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. तीन वर्षांपासून दोन्ही गावे कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत तसेच सदर दोन्ही गावांत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना ग्रामपंचायती अभावी जनतेला मिळत नसून, दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर या गावाला ८०० ते ९०० लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात आला. त्याच धर्तीवर विशेष बाब म्हणून रवी व मुल्लरचक या गावांना ग्रामपंचायतींना दर्जा मिळावा, किंवा जवळच्या वाघाळा ग्रामपंचायतीमध्ये ही दोन्ही गावे समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी नायब तहसीलदार चापले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्‍वास भोवते, आदिवासी काँग्रेस सेलचे सचिव दिलीप घोडाम, पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये, नगरसेवक माणिक भोयर, सुरेश मरापा, विठोबा कामठे, राजकुमार नंदर्धने, शामराव शिलार या वेळी उपस्थित होते. 

दोन्ही गावे झाली निराधार  गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही ग्रामपंचायत अंतर्गत समावेश नसल्याने रवी व मुलुरचक ही दोन्ही गावे निराधार झाली आहेत. परिणामी गावात कोणतेही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com