केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या : खासदार पाटील

उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने हेक्टरी ३६ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या : खासदार पाटील
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या : खासदार पाटील

जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून (हवामानावर आधारित) २०२०-२१ साठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना अत्यल्प परतावे मंजूर झाले. केवळ १३५०० रुपये प्रतिहेक्टरी देण्यात आली असून, उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने हेक्टरी ३६ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून २०२०-२१ मध्ये जळगाव तालुक्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे क्लेम सेटल झाले आहेत. जळगाव तालुक्यात भोकर महसूल मंडळातील पात्र ३०९१ शेतकऱ्यांना सहा कोटी २७ लाख ६४ हजार ६६० रुपये परतावा मंजूर झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतलेल्या जळगाव जिल्ह्यातील मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतील तापमानाच्या (महावेध) नोंदीनुसार परतावे हेक्टरी ३६ हजार रुपये एवढे मिळायला हवेत. पण कंपनीने भोकर मंडळातील शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी १३ हजार ५०० रुपये परतावा मंजूर केला आहे. तापमानाच्या (महावेध) अहवालानुसार जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळाचे तापमान २६ मार्च ते १३ मार्च २०२१ या कालावधीत सलग सहा दिवस ४२ अंश सेल्सीअसपेक्षा जास्त असल्याचे दिसते. संदर्भ शासन निर्णयानुसार या कालावधीतील नुकसानभरपाईची किंवा परतावा रक्कम नऊ हजार रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे असणे आवश्यक आहे. 

तसेच २५ एप्रिल २०२१ ते २ मे २०२१ या कालावधीत आठ दिवस व ४ मे २०२१ ते १२ मे २०२१ या कालावधीत नऊ दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे कळते. या कालावधीतील तापमानासंबंधी नुकसान परतावा रक्कम १३ हजार ५०० रुपये व मे महिन्यातील तापमानासंबंधी १३ हजार ५०० रुपये रक्कम मंजूर होण्याची अपेक्षा आहे. यानुसार हेक्टरी एकूण ३६ हजार रुपये परतावा या मंडळातील शेतकऱ्यांना मिळायला हवा. पण फक्त १३ हजार ५०० रुपये परतावा रक्कम मंजूर झाली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासन, शासनाने लक्ष देऊन याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com