साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील दुरावा १० टक्क्यांवर 

साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील दुरावा १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. राज्य सहकारी बँकेने एकूण कर्ज पुरवठ्यापैकी ४० टक्के कर्जपुरवठा राज्यातील साखर कारखान्यांना केला आहे.
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील दुरावा १० टक्क्यांवर 
Goods factory Karjaveel Durava 10 Takkyanwar

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील दुरावा १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. राज्य सहकारी बँकेने एकूण कर्ज पुरवठ्यापैकी ४० टक्के कर्जपुरवठा राज्यातील साखर कारखान्यांना केला आहे. महाराष्ट्रात चालू वर्षी ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने हंगाम २०२१-२२मध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.  यापैकी काही साखर कारखान्यांना ऊस पुरवठादारांना, त्यांनी कारखान्यांना दिलेल्या उसाचे पेमेंट एक रकमी करावे लागते. या कारखान्यांची एफआरपी ३०००च्यावर असल्याने त्यांना राज्य बँकेच्या १५ टक्के मार्जिनमुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पेमेंट करण्यासाठी रक्कम अपुरी पडते. ही बाब लक्षात घेऊन, अशा कारखान्यांची ही अडचण सोडविण्याचा निर्णय राज्य बँकेच्या प्रशासक सभेत घेण्यात आला. हे करताना ज्या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे व जे साखर कारखाने राज्य बँक कर्जाची सुरुवातीपासून ते आजपावेतो नियमित परतफेड करीत आहेत, या कारखान्यांचा मुख्यत्वे यात विचार करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य बँकेने हंगाम २०२१-२२मधील अशा साखर कारखान्यांच्या उत्पादित साखर साठयावर आकारण्यात येणारा १५ टक्के दुरावा ५ टक्क्याने कमी करून उपलब्ध होणारी रक्कम एफआरपी प्रमाणे ऊस पेमेंटसाठी उपलब्ध करून देणेचा निर्णय घेतल्याचे बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com