‘बायो कॅप्सूल’द्वारे हरभरा मर रोग व्यवस्थापन प्रात्यक्षिक

तोंडापूर (ता.कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे वरुड (ता. कळमनुरी) येथे हरभरा पिकांवरील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायो कॅप्सूल आधारित तंत्रज्ञानाद्वारे बीजप्रक्रिया करून प्रात्यक्षिके घेण्यात आले.
bio capsule
bio capsule

हिंगोली ः  तोंडापूर (ता.कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे वरुड (ता. कळमनुरी) येथे हरभरा पिकांवरील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायो कॅप्सूल आधारित तंत्रज्ञानाद्वारे बीजप्रक्रिया करून प्रात्यक्षिके घेण्यात आले. या प्रात्यक्षिकांचे निष्कर्ष उत्साहवर्धक आढळून आले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदा १ लाख २४ हजार ६५१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्यावरील मररोगामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येऊ शकते. या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे आर्थिक नुकसानीत वाढ होते. बीजप्रक्रिया करून मररोगाचे व्यवस्थापन करता येते. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे यंदा प्रथमच वरुड (ता. कळमनुरी) येथील शेतावरील चाचणी कार्यक्रमांतर्गत तुलनात्मक अभ्यासासाठी प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यात हरभरा (वाण ः जाकी ९२१८) बियाण्यावर ट्रायकोर्डमा कॅप्सूल, रायझो कॅप्सूल हे घटक असलेल्या बायो कॅप्सूल आधारित तंत्रज्ञानाने बीजप्रक्रिया करून १० एकर क्षेत्रावरील पिकांमध्ये चाचणी घेण्यात आली. त्या प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये बियाण्याची उगवणक्षमता ८५ टक्के झाली असल्याचे, तसेच मररोगाचा प्रादुर्भाव ३ टक्के आढळून आला आहे.

बायो कॅप्सूल आधारित तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात मर रोगाचे व्यवस्थापन शक्य आहे. त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होईल  परंतु अंतिम निष्कर्षासाठी अजून एक वर्ष या पद्धतीने चाचणी घ्यावी लागेल, असे भालेराव यांनी सांगितले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com