ग्राम विकास विभागाचे ग्रामपंचायतींना कोरोना लढ्यासाठी आर्थिक पाठबळ

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेल्या रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगासंबंधित प्राप्त निधीच्या २५ टक्केच्या मर्यादेत खर्च करण्यास ग्राम विकास विभागाने मान्यता दिली.
To the Gram Panchayats of the Rural Development Department Financial support for the Corona fight
To the Gram Panchayats of the Rural Development Department Financial support for the Corona fight

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेल्या रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगासंबंधित प्राप्त निधीच्या २५ टक्केच्या मर्यादेत खर्च करण्यास ग्राम विकास विभागाने मान्यता दिली.

ज्या ग्रामपंचायतींनी ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या विलगीकरण कक्षाची मागणी केली आहे. ही बाब सन २०२१-२२ या वर्षाच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यात समाविष्ट व आवश्यक ते बदल करण्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभेची, ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागेल. मात्र सध्या ग्रामसभेस अडचणी आल्याने ठराव ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर तालुका तांत्रिक समितीची मान्यता घेऊन परिपूर्ण प्रस्ताव गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने या कार्यालयास तत्काळ सादर करावे, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियोजनानुसार व निर्देशानुसार प्रत्यक्ष कार्यवाही ही संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली संबंधित ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना करावी लागेल. एकच बाबीवर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींकडून दुबार खर्च होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. १५ व्या वित्त आयोगाबाबतच्या सर्व शासन निर्णय व संदर्भ यास लागू राहतील. त्यानुसार कार्यवाही करावी, असे नमूद केले. 

ग्रामस्तरावर अनेक ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तीने कोरोनाशी लढा देत होत्या. मात्र हा निर्णय शासनाने घातल्याने काम करताना दिलासा मिळाला आहे. आता कोरोनाशी सक्षमपणे लढा देता येईल.  - बाळासाहेब म्हस्के, राज्य उपाध्यक्ष, सरपंच सेवा महासंघ, जि. नाशिक.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावर चांगली सेवा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करू. ग्रामपंचायतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याच्या बाबतीत योग्य ते नियोजन करून त्याबाबतचा आढावा घेतला जाईल. तसे नियोजन सुरू आहे.  - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com