वृक्षसंवर्धनाचे नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वावडे

वृक्ष लागवड
वृक्ष लागवड
नगर  : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीसाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी जास्त वृक्षलागवड केल्याचा कांगावा करण्यात आला; मात्र गेल्या दोन वर्षांत सरासरी अवघी ५० टक्के झाडे जिवंत आहेत. खर्च करून झाडे जगविण्याकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने वन विभाग, सामाजिक वनीकरण यांच्यामार्फत राज्यात व्यापक वृक्षलागवड मोहीम आखली. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येते.
 
२०१६ मध्ये जिल्ह्यात १३११ ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीत वृक्षलागवड केली. २०१६ मध्ये एक जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करण्यात आली होती. २०१७ मध्येही सुमारे पाच लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले होते. दोन्ही वर्षांमध्ये ग्रामपंचायतींनी उद्दिष्टापेक्षा जास्त झाडांची लागवड केली; पण वृक्ष जगविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची होती.
 
यंदा ग्रामपंचायतींनी उद्दिष्टापेक्षा जास्त खड्डे खोदल्याने यंदा जास्त रोपांची लागवड करण्यात आली. दोन वर्षांची सरासरी पाहिली, तर ग्रामपंचायतींनी अवघी ५० टक्के झाडे जगविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुसतेच वृक्षारोपण करून ग्रामपंचायतीने कागदोपत्री अहवाल रंगविले; पण खर्च करूनही वृक्षजतन करण्याकडे ग्रामपंचायतीने डोळेझाक केल्याचे स्पष्ट होत आहे.
 
एक जुलै २०१६ ला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी एक लाख चार हजार २०१६ रोपांची लागवड केली होती. त्यापैकी आजमितीस अवघी ५५ हजार १३६ झाडे जिवंत आहेत. २०१७ मध्ये चार लाख ९३ हजार १८८ रोपांची लागवड केली. प्रत्यक्षात सार्वजनिक वन विभागाकडून ग्रामपंचायतींना कमी प्रमाणात झाडे उपलब्ध झाली होती. त्यातील तीन लाख १० हजार २३० रोपे जिवंत आहेत. यंदा पाणी असूनही रोपे जतन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निष्काळजीपणा स्पष्ट होत आहे. 
 
तालुकानिहाय जतन रोपांची टक्केवारी 
२०१६ ः अकोले ४६, जामखेड ७२, कर्जत ३६, कोपरगाव ७८, नगर २४, नेवासे ५१, पारनेर ५९, पाथर्डी ५६, राहाता ९७, राहुरी ८५, संगमनेर ५२, शेवगाव ३०, श्रीगोंदे ६२, श्रीरामपूर ६३ ः एकूण ५३ टक्के. २०१७ ः अकोले ७२, जामखेड ७४, कर्जत ८१, कोपरगाव ७९, नगर ८, नेवासे ६४, पारनेर ६७, पाथर्डी ७३, राहाता ८४, राहुरी ८४, राहुरी ७८, संगमनेर ६१, शेवगाव ४०, श्रीगोंदे ८९, श्रीरामपूर ५२ ः एकूण : ६२ टक्के.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com