अतिवृष्टीमुळे द्राक्ष निर्यात लांबली

दरवर्षी द्राक्ष निर्यातीचा मुख्य हंगाम डिसेंबरपासून सुरू होतो. मात्र ऑक्टोबरपासून सुरू होणारी थोड्याफार प्रमाणावरील निर्यात मंदावली आहे. जानेवारीपासून ती सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक
grapes export
grapes export

नाशिक : जागतिक पातळीवर पहिली द्राक्ष निर्यात कसमादे पट्ट्यातून होते. पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनात हा भाग आघाडीवर आहे. मात्र यंदा सटाणा, देवळा, मालेगाव, कळवण या तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. यामुळे पूर्वहंगामी द्राक्षांना तडे जाणे, घडकुज यामुळे निर्यातक्षम द्राक्ष गुणवत्तेवर परिणाम झाला. परिणामी ऑक्टोबर महिन्यात होणारी देशातील पहिली द्राक्ष निर्यात लांबली आहे.  कसमादे पट्ट्यातून होणाऱ्या पहिल्या द्राक्ष निर्यातीला १०० रुपयांपासून तर कधी २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. निर्यातक्षम द्राक्षबागेचे नियोजन करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी आपले कौशल्य विकसित केले आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत देशाला परकीय चलन देण्यात येथील शेतकऱ्यांचा वाटा असतो. मात्र, या भागातील नुकसानीमुळे चालू वर्षातील निर्यातीचे काम अजूनही बंदच आहे. त्यामुळे परदेशातही बाजारात उपलब्ध होणाऱ्या द्राक्ष वाणांची उणीव भासणार आहे. सफेद व काळ्या आशा दोन्हीही रंगांत क्लोन २, शरद सीडलेस, थॉमसन, सोनाका, तास ई गणेश, क्रीम्सन हे वाण उपलब्ध असतात. मात्र झालेल्या नुकसानीमुळे द्राक्ष निर्यातीचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. प्रामुख्याने रशिया व दुबई मार्केटला प्रचंड मागणी असताना द्राक्ष पाठवीत येत नसल्याची खंत द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखवली. मागील वर्षी सफेद वाणांना ११० ते ११५ पर्यंत तर काळ्या वाणास १६० ते १७० पर्यंत दर मिळाले होते. चालू महिन्यातील निर्यात ९९ टक्क्यांनी घटली जिल्ह्यात सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यांत काही ठिकाणी माल काढणीसाठी आला आहे. मात्र, निर्यातक्षम माल उपलब्ध होत नसल्याने मागणी असूनही माल पाठविता येत नाही. श्रीलंका १ व रशिया ९ असे एकूण १० कंटेनर निर्यात झाली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत ९९ टक्क्यांनी चालू महिन्यातील निर्यात घटल्याचे पाहायला मिळत आहे.  मागील वर्षी झालेली निर्यात ऑक्टोबर     १९४ मे.टन नोव्हेंबर    २७२३ मे.टन प्रतिक्रिया मागील वर्षी द्राक्ष निर्यात ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली होती. रशिया आणि दुबईत यंदा लवकर सुरू होणारी द्राक्ष निर्यात मंदावली आहे. मागणी आहे, मात्र चांगला माल नसल्याने अडचणी आल्या आहेत. - खंडेराव शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, जि. नाशिक   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com