लासलगावातून पहिल्यांदाच द्राक्षे बिहारमध्ये रवाना

लासलगाव, ता. निफाड : जिल्ह्यातील द्राक्ष काढणी हंगामाची सुरुवात झाली आहे. त्यानुसार नाशिकची द्राक्ष देशभरातील बाजारपेठेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
 Grapes were shipped to Bihar for the first time from Lasalgaon
Grapes were shipped to Bihar for the first time from Lasalgaon

लासलगाव, ता. निफाड : जिल्ह्यातील द्राक्ष काढणी हंगामाची सुरुवात झाली आहे. त्यानुसार नाशिकची द्राक्ष देशभरातील बाजारपेठेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन वाणाचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेल्वेद्वारे प्रथमच बिहार राज्यातील दानापूर-पटना येथे १०२ क्रेट्समधून एक टन २० किलो द्राक्ष रवाना झाली आहेत. 

किसान रेल्वेत लोडिंग करण्याअगोदर लासलगाव बाजार समितीच्या सभापती सूवर्णा जगताप यांच्या हस्ते द्राक्ष क्रेट्सचे पूजन करण्यात आले. लासलगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जे. एच. हिंगोले, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रंजना शिंदे, सतीश सोळसे आदी उपस्थित होते.

थंडीचा जोर ओसरू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येणाऱ्या दिवसांत निर्यातीसाठी जास्ती जास्त द्राक्षे दाखल होतील, असा आशावाद लासलगाव रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाचे प्रमुख विजय जोशी यांनी व्यक्त केला.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com