पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा निधी ग्रामपंचायतींना परत: चंद्रकांत ठाकरे

ग्रामपंचायतींकडून वेळेत विद्युत भरणा करण्यास विलंब होत आहे. ज्या ग्राम पंचायतींकडून पाणीपुरवठा योजनेची थकीत व चालू वीज देयकाची रक्कम पूर्णपणे भरून तसे प्रस्ताव १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करावेत.
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक  भरल्यास अर्धा निधी ग्रामपंचायतींना परत: चंद्रकांत ठाकरे
Half of the funds will be returned to the Gram Panchayat if the arrears of water supply are paid - Chandrakant Thackeray

वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळ योजनेअंतर्गत स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यात येते. परंतु ग्रामपंचायतींकडून वेळेत विद्युत भरणा करण्यास विलंब होत आहे. ज्या ग्राम पंचायतींकडून पाणीपुरवठा योजनेची थकीत व चालू वीज देयकाची रक्कम  पूर्णपणे भरून तसे प्रस्ताव १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केल्यास अशा ग्राम पंचायतींना त्यांच्या रकमेतून ५० टक्के रक्कम परत देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.  ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु बहुतांश ग्रामपंचायतींकडून वेळेत विद्युत भरणा होत नसल्याचे दिसत आहे. वेळेत पाणीपुरवठा योजनेचा भरणा वीजवितरण विभागाकडे भरण्यात येत नसल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्तीमधून ग्रामपंचायतींना अर्थसाहाय्य करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या ग्रामपंचायती पाणीपुरवठ्याच्या थकीत व चालू वीज देयकाची रक्कम पूर्णपणे भरून वीज वितरण विभागाकडून नील प्रमाणपत्र घेऊन तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करतील अशा ग्रामपंचायतीला त्यांच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम परत देण्यात येईल. संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिवांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.