अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम

भंडारदरा धरणातील साठा
भंडारदरा धरणातील साठा

नगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासात घाटघर, रतनवाडीला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढता असल्याने भंडारदरा धरणासह मुळा, निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या.

पावसाळ्याचा दिड महिना उलटला असला, तरी अजूनही जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस नाही. आता अनेक भागात अल्प पावसावरच पेरण्या, कापूस लागवड उरकली जात आहे. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात मात्र गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत घाटघरला ३४१, रतनवाडीला ३२७, पांजरे येथे १६५, भंडारदरा येथे १५२ निळवंडेला १२७, अकोले येथे २३, कोतुळ येथे १० मि.मी. पावसाची नोंद झाली. मुळा धरणात सध्या १७ हजार २४३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणात ७०२५ दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून धरण ६३.६३ टक्के भरले आहे. निळवंडे धरणात १९.६९ टक्के, तर मुळात धरणात ८७९४ दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला आहे.

अकोले तालुक्यात पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. जिल्ह्याच्या अन्य भागातही सोमवारी पाऊस झाला. जोराचा पाऊस नसला तरी झालेल्या पावसाने मात्र पेरणी, लागवड केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com