सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी २४.७२  मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात १५.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असून, मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. पूर्वेकडील दुष्काळग्रस्त तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, सातारा, पाटण, जावळी या चार तालुक्यांत दमदार पाऊस सुरू असून, या तालुक्यांत ३० मिमीदरम्यान पावसाची नोंद झाली आहे.

दमदार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले असून, बहुतांशी कामे ठप्प आहेत. कराड, वाई, खंडाळा या तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या तालुक्यांत जमिनीच्या घातीवर शेतातील कामे सुरू आहेत. खटाव, माण, फलटण, कोरेगाव या दुष्काळग्रस्त तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या तालुक्यांत पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहे.

पश्चिमेकडे दमदार पावसामुळे भात, ऊस लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. कोयनेसह सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयना येथे १०७, नवजा येथे १९०, महाबळेश्वर येथे १४९  मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणात २४ तासात १.२५ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंत धरणातील पाणीसाठा १५.१४ टीएमसी झाला. तालुकानिहाय पाऊस मि.मी. ः सातारा ३१.४०, जावळी २९.०२,  पाटण ३३.७३, कराड २२.६९, कोरेगाव ९.६७, खटाव ४.७३, माण ३, फलटण  ६.७८, खंडाळा १६.९५, वाई १९.१७, महाबळेश्वर १५४.८५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com