कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी 

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे.
rain 14 june
rain 14 june

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. रत्नागिरी येथे २४३.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पावसाचा प्रभाव अधिक असल्याने दरडी कोसळल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. जोरदार पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. ठाणे, पालघर, मुंबई परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात कडक ऊन पडत आहे. काही भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी तुरळक सरी पडल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यात पाऊस  मराठवाड्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर भागांत पाऊस होत असला तरी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. धर्माबाद येथे ८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर परभणी येथे ७२.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

विदर्भात जोर ओसरला  विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडत असल्याने पेरणीच्या कामांची  चांगलीच लगबग सुरू आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ जिल्हयात हलक्या सरी कोसळत आहे. अर्णी, बल्लारपूर, गोंडपिंपरी, उमरखेड या मंडळात पावसाच्या मध्यम ते जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अजूनही धरणसाठ्यात वाढ झालेली नाही. 

सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मि.मी.)मध्ये : स्त्रोत ः हवामान विभाग  कोकण : महाड ५७, माणगाव ८३, म्हसळा ९०, पेण ५६, पोलादपूर ६५, सुधागडपाली ३३, तळा ६५, , गुहागर ९०, हर्णे ५४.४, खेड ५३, लांजा ९५, मुलगुंद ५५, संगमेश्वर ९५, देवगड ३५, कुडाळ ७०, मालवण ४९, वैभववाडी ३७. 

मध्य महाराष्ट्र : आजरा २२, चंदगड ४५, गगणबावडा ५१. 

मराठवाडा : वसमत ३०, अहमदपूर ५५, चाकूर ३४, देवणी ३२, अर्धापूर ३८, भोकर ६६, धर्माबाद ८५, हादगाव ६४,  किनवट ५४, माहूर ५०, मुदखेड ३४, उमरी ४२, जिंतूर ४१, पालम ३५, परभणी ७२.८. 

विदर्भ : बल्लारपूर ५२.४, चंद्रपूर ३४.६, गोंडपिंपरी ५०, जेवती २७, अर्णी ८१.५, घाटंजी २८.८, उमरखेड ३९.९.  शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे  रत्नागिरी २४३.५, राजापूर १२९, दापोली १११दोडामार्ग १२४, कणकवली १३५, मुलदे (कृषी) १०९.४, सावंतवाडी १२०.८. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com