परभणी, हिंगोलीत मुसळधार

परभणी ः मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील ४७ आणि हिंगोली जिल्ह्यातील २६ अशा एकूण ७३ मंडळांमध्ये बुधवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
heavy rain in Parbhani, Hingoli
heavy rain in Parbhani, Hingoli

परभणी ः मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील ४७ आणि हिंगोली जिल्ह्यातील २६ अशा एकूण ७३ मंडळांमध्ये बुधवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर, कावलगाव मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त, तर आडगाव, दुधगाव, लिमला, कात्नेश्वर, चुडावा, औंढा नागनाथ या मंडळांत ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. जोरदार पावसामुळे ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या.

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी (ता.८) मध्यरात्री नंतर तीन वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक मंडळात ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसास सुरवात झाली.अनेक भागात सकाळी आठवाजेपर्यत पाऊस सुरु होता. जिंतूर, सेलू, पूर्णा, परभणी तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. शेतजमिनीतील सखल भागात पाणी साचले. शेताबाहेर पाणी निघाल्याने ओढे, नाले भरून वाहिले. 

जिंतूर तालुक्यातील करपरा नदी भरून वाहिली. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत ११५.२ मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी ) ः

परभणी जिल्हा ः परभणी ६१.८, पेडगाव ३०, जांब १५.४, झरी १५.४, पिंगळी १५.४, जिंतूर १००.५,  सावंगी म्हाळसा ५३.८, बामणी ४४.५, बोरी ६०.८, आडगाव ८२.३, चारठाणा १९, वाघी धानोरा १५,दुधगाव ८१.८ ,  सेलू १६.७, वालूर २४.८, कुपटा २५, चिकलठाणा १७, मानवत १८.५, कोल्हा ९.८, ताडबोरगाव ४०.३, आवलगाव ८.५,  वडगाव ८.३,  महातपुरी १५.८, माखणी ६,  पिंपळदरी ८, पालम २९.८, चाटोरी ७.३, बनवस ६.३, पेठशिवणी २०, रावराजूर ३६.८, पूर्णा ५५.३, ताडकळस ३१.८, लिमला ६७.१, कात्नेश्वर ६८, चुडावा ६५.५, कावलगाव ११४.८.  हिंगोली जिल्हा ः हिंगोली १९.८, नरसी २०, सिरसम १२, बासंबा १२.८, दिग्रस कऱ्हाळे ४२, माळहिवरा १३.८, खंबाळाा १६, कळमनुरी २१.८, वाकोडी १७, नांदापूर १८.७, डोंगरकडा १८.७, वारंगा ३६, वसमत ५५.८, हयातनगर १६.३, हट्टा ३४, गिरगाव १६.३ टेंभुर्णी ३६.८, कुरुंदा ४३.३, औंढानागनाथ ६७.३, साळणा ५९.३, जवळा बाजार ४२, सेनगाव ४९, गोरेगाव २२, आजेगाव ५१, पानकनेरगाव   ३५, हत्ता ३७.५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com