कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज 

दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तीन ते चार दिवसांपासून सक्रिय आहे. यामुळे कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज 
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज 

पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तीन ते चार दिवसांपासून सक्रिय आहे. यामुळे कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात ढगाळ वातावरण असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने उकाडाही वाढत आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भातही हलक्या सरी बरसत आहेत. उद्यापासून राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा काही प्रमाणात वाढणार असून, काही भागांत पावसाचा शिडकावा होईल. शनिवारी (ता. १९) सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

राज्यात होत असलेल्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसची घट झाली. कोकणात कमाल तापमानात २९ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २० ते ३२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान २७ ते ३२ अंश सेल्सिअस, तर कोकणात २९ ते ३३ अंश सेल्सिअसच्या  दरम्यान होते. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही काही प्रमाणात घट झाली असून महाबळेश्‍वर येथे १७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  रविवार ः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर.  सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.  मंगळवार ः रायगड.  बुधवार ः रायगड.  शनिवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३२.९ 
  • अलिबाग - ३२.८ 
  • रत्नागिरी - २९.५ 
  • डहाणू - ३०.१ 
  • पुणे - २८.३ 
  • जळगाव - ३४ 
  • कोल्हापूर - २६.१ 
  • महाबळेश्‍वर - २० 
  • मालेगाव -- ३५ 
  • नाशिक - २८.५ 
  • सांगली - २६.८ 
  • सातारा - २५.२ 
  • सोलापूर - ३२.४ 
  • उस्मानाबाद - २७.२ 
  • औरंगाबाद - ३१.५ 
  • परभणी -- ३२.२ 
  • बीड -- ३२.८ 
  • अकोला - ३४.१ 
  • अमरावती - ३२.८ 
  • बुलडाणा - २९ 
  • ब्रह्मपुरी - ३४ 
  • चंद्रपूर - ३२ 
  • गोंदिया - ३१.५ 
  • नागपूर - ३३ 
  • वर्धा - ३३.५ 
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com