कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात पावसाची ‘झोडधार’

गडचिरोली ः पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे १५० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
गडचिरोली ः पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे १५० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६) पावसाने झोडून काढले. तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  कोकणात दमदार पाऊस पडत असल्याने भातखाचरे भरून वाहत आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा काठावरील ऊस शेती पाण्याखाली गेली होती. कोल्हापुरात चंदगड, राधानगरी गगनबावड्यात धुवाधार पाऊस पडत असून, नद्यांचे पाणी वाढू लागल्याने ७५ बंधारे पाण्याखाली गेले. कृष्णा, वारणा, पंचगंगा आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ   झाली.  पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, मावळ, मुळशीसह पश्‍चिम भागांतील काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दमदार पावसाने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

विदर्भातील नागपूर, गडचिरोलीत संततधार पाऊस पडत असून, गडचिरोलीच्या भामरागड तालुक्‍यात पर्लकोटा नदीला पूर आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला, तसेच अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून,  हिंगोलीतील गोरगाव-सेनगाव रस्त्यावरील गोटवाडी येथील पाझर तलाव तुडुंब भरल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी शिरले. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडला. खानदेशातही धुळे, जळगाव जिल्ह्यांत हलक्या पावसाने पिकांना दिलासा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या आदिवासी तालुक्‍यांसह इतरही बहुतांश तालुक्‍यात पावसाचा जोर वाढला होता. 

सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये - स्राेतकृषी विभाग)

कोकण : ठाणे ११२, मुंब्रा १३८, दहिसर ११५, बेलापूर १४५, कल्याण १५१, अप्पर कल्याण १५३, टिटवाळा १२९, ठाकुरली १५८, नडगांव १५७, मुरबाड १७४, देहरी १०५, न्याहडी १४४, सरळगाव १९८, भिवंडी ११०, अप्पर भिवंडी ११६, अंगाव १२९, डिघशी १३८, पडघा १०५, खारबाव १०५, शहापूर १०४, खर्डी १६८, किन्हवळी २१०, वसींड १५५, डोलखांब १२९, उल्हासनगर २२४, अंबरनाथ १७०, गोरेगाव १८३, कुंभर्ली २३१, बदलापूर १७०, नेरळ २६२, कळंब २०१, पेण १२०, कामरली १०५, बिरवडी १४९, नाटे १३३, खारवली १००, पोलादपूर १२५, कोंडवी १४३, वाकण १३९, खामगाव १०५, कळकवणे १०३, शिरगांव ११५, कुलवंडी १०२, मंडणगड ११०, म्हाप्रल ११६, देव्हरे १०३,कोंडगाव १०५, विलवडे ११२, अंबोली १०४, सांगवे १४७, वागडे ११६, मानिकपूर १२४, वाडा १७१, कडूस १२२, कोणे ११७, कांचड २०६, साइवन १८९, कसा १२४, पालघर १०१, मनोर १८२, अगरवाडी १२५, जव्हार १९६, साखर २२०, मोखडा २०४, तलासरी २३५, झरी २१८, विक्रमगड १५५, तलवड १४०.

मध्य महाराष्ट्र : नाणशी ९६, इगतपुरी २१६, घोटी १०८, पेठ ११९, त्र्यंबकेश्‍वर ८८, वेळुंजे १८०, हर्सूल १८१, शेंडी १५२, पौड ९६, माले ११६, मुठे १०७, भोलावडे १४०, निगुडघर ९२, काले १५४, कार्ला १५६, खडकाळा १०१, लोणावळा २८५, पानशेत ९०, राजूर १४५, कुडे ८८, बामणोली ११७, केळघर १२१, हेळवाक १७१, महाबळेश्‍वर २९९, तापोळा २६५, लामज २८९, बाजार ८५, करंजफेन ८९, आंबा ११०, राधानगरी १३४, कसबा ९३, कडेगाव ९५, कराडवाडी ८५, गवसे १४४, चंदगड १०७, तुर्केवाडी ८६, हेरे १४०. 

मराठवाडा : जळकोट २०, नळदुर्ग २०, बोधडी २७, जलधारा २१, मांडवी ३१, दहेली ३६, माहूर ३२, वाई ४८, सिंदखेड ३९, गोळेगाव २२. 

विदर्भ : चांदई ५८, पणज ५०, किन्हीराजा ५८, निमखेडा ५०, मोहाडी ५१, करडी ६६, कान्हाळगाव ६७, तुमसर ८६, शिवरा ६७, मिटेवणी ९७, पिंपळगाव ५२, विरली ५८, गंगाझारी ५८, रत्नारा १७९, दासगाव ५०, रावणवाडी १०३, गोंदिया १६५, खामरी १२०, परसवाडा १२२, तिरोडा १०७, मुंडीकोटा ५५, वाडेगाव १३९, ठाणेगाव ७२, गोरेगाव १४५, कुऱ्हाडी १५५, मोहाडी ८२, दारव्हा ५६, चंद्रपूर ५६, मूल ५१, गांगळवाडी ८०, तालोधी ५६, सिंदेवाही ९७, मोहाली ५५, सावळी ५५, पाथरी ५५, विहाड ५५, पोंभुर्णा ५३, गडचिरोली २३६, पोरळा १८५, येवळी ११२, ब्राह्मणी २०५, देऊळगाव ८४, वैरागड ५९, चामोर्शी ८०, कुंघाडा ६६, आष्टी ९३, येनापूर ६५, आहेरी ५५, अल्लापाल्ली ७३, पेरमिली ५८, एटापल्ली ११६, जरावंडी ७७, गाट्टा १२३, धानोरा १५०, चाटेगाव ११०, पेंढरी ८०, मुलचेरा ९९, भामरागड खुर्द ९०, भामरागड ११८.   राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. १७) कोकणात अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी (ता. १८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, अनेक जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com