ऊस गाळपात जवाहर साखर कारखान्याचा उच्चांक

ज्यात गेले १४० दिवस सुरू असलेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगामाचा पट्टा पडला आहे. हंगामात १९० साखर कारखान्यांनी एक हजार १२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यात सहकारी ९५ आणि खासगी ९५ कारखाने आहे.
The height of Jawahar Sugar Factory in sugarcane crushing
The height of Jawahar Sugar Factory in sugarcane crushing

पुणे ः राज्यात गेले १४० दिवस सुरू असलेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगामाचा पट्टा पडला आहे. हंगामात १९० साखर कारखान्यांनी एक हजार १२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यात सहकारी ९५ आणि खासगी ९५ कारखाने आहे. त्यापोटी जवळपास १०६३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा सरासरी १०.५० टक्के एवढा होता. यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक १८.८८ लाख टन ऊस गाळप केले असल्याने राज्यभरातून चर्चेचा विषय ठरला आहे.

उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपला आहे. यंदा ११ लाख ४२ हजार हेक्टरवरील ऊसगाळपासाठी उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी ८ लाख २२ हजार हेक्टरवरील गाळपासाठी उपलब्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती.

यंदा उसाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता २५०० ते १०,००० टनाच्या दरम्यान होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ३१, नगर जिल्ह्यात २२, कोल्हापूर २२ कारखाने सुरू झाले होते. उसाची उपलब्धता अधिक असल्याने गळीत हंगाम उशिराने बंद होण्यास सुरुवात झाली. नगर जिल्ह्याने ऊसगाळपात आघाडी घेत तब्बल एक कोटी ५५ लाख १५ हजार ७५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून एक कोटी ५२ लाख १२ हजार ३०३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा ९.८० टक्के एवढा होता. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यानेही चांगले गाळप व साखरेचे उत्पादन घेतले आहे.  

विभागनिहाय कारखान्यांकडून उसाचे गाळप, साखर उत्पादन
विभाग कारखाने ऊसगाळप (लाख मे. टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) साखर उतारा टक्के
कोल्हापूर ३७ २३१ २७७ १२.००
पुणे        ३१ २३१ २५३ १०.९७
सोलापूर  ४३ १७६ १६५ ९.३८
नगर      २६ १७० १६७ ९.८३
औरंगाबाद २२ १०० ९७ ९.६९
नांदेड     २६ ९४ ९४ ९.९७
अमरावती ८.९३
नागपूर ८.९४ 

यंदा कोरोना काळ असतानाही राज्यातील सर्वच कारखान्यांनी चांगल्या प्रकारे उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे राज्यात साखर उत्पादनाचा उच्चांक झाला आहे. साखर उताराही चांगला राहिला आहे. जवाहर कारखान्याने जवाहर कारखान्याने सर्वच बाबतीत आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com