हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७० कोटींचा

हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत हिंगोली जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत ४९ कोटी १२ लाख ९० हजार रुपयांचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे.
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७० कोटींचा
Hingoli's annual plan 170 crore

हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत हिंगोली जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत ४९ कोटी १२ लाख ९० हजार रुपयांचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा १७० कोटी रुपयांचा झाला आहे. त्यास वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक झाली. पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार राजू नवघरे, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, पालक सचिव एन. आर. गद्रे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत प्रत्यक्ष १२० कोटी ८७ लाख १० हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी १५४ कोटी २३ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. गायकवाड यांनी विशेष बाब म्हणून शिक्षण व आरोग्यविषयीची कामे करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यात जो जिल्हा मराठवाड्यात पहिला येईल, त्या जिल्ह्याला बक्षीस म्हणून ५० कोटीचा विशेष निधी देऊ. शंभर टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.