शेतमाल पुरवठ्यासाठी हॉर्टीकल्चर ट्रेन 

देशांतर्गत शेतमालाची पुरवठा साखळी पूर्ववत करण्यासाठी केंद्राने स्पेशल हॉर्टीकल्चर ट्रेन सह कोवीड १९ पार्सल ट्रेन सुरु केली आहे.
railway-parcel
railway-parcel

पुणे/अकोला: देशांतर्गत शेतमालाची पुरवठा साखळी पूर्ववत करण्यासाठी केंद्राने स्पेशल हॉर्टीकल्चर ट्रेन सह कोवीड १९ पार्सल ट्रेन सुरु केली आहे. केंद्र सरकारने नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉन्कॉर) च्या संयुक्त सहकार्याने देशात नाशिक ते दिल्ली-कोलकाता येथे कांदा पुरवठा करण्यासाठी ‘स्पेशल हॉर्टीकल्चर ट्रेन’ सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील शेतमाल व अत्यावश्यक वस्तू देशामध्ये वाहतुकीसाठी एकूण ५८ रेल्वेमार्गावर १०९ पार्सल ट्रेनची सुविधा नुकतीच सुरु केलेली आहे. स्पेशल हॉर्टीकल्चर ट्रेन देशात उत्पादित होणाऱ्या एकूण कांद्याच्या ३५ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादित होत असल्यामुळे महाराष्ट्र हे एक पुरवठादार राज्य म्हणून या उपक्रमात सहभागी होत असल्याचे राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यासाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाने उत्तरेकडील पंजाब, दिल्ली, बिहार तसेच दक्षिण पूर्वेकडील पश्चिम बंगालमधील कांद्याच्या खरेदीदारांना कांदा पुरवठा करण्यासंदर्भात राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापारी यांची यादी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  कांदा उत्पादकांना परराज्यात विक्री करण्यासाठी १ हजार ४०० टन क्षमता असलेली ४० बोगीची स्वतंत्र रेक अथवा किमान ८ ते ९ बोगीसुध्दा कॉन्कॉरच्या माध्यमातून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बांडला यांनी स्पष्ट केले. 

अशी करा नोंदणी उत्तरेकडील पंजाब, दिल्ली, बिहार तसेच दक्षिण पूर्वेकडील पश्चिम बंगालमधील खरेदीदारांना कांदा पुरवठ्यासाठी तसेच नाशिक ते दिल्ली-कोलकाता येथे कांदा पुरवठा करण्यासाठी ‘स्पेशल हॉर्टीकल्चर ट्रेन’च्या बुकिंगसाठी इच्छुक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापारी यांनी कृपया md@nhb.gov.in आणि srinivasanurag@gmail.com या दोन ई- मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीनिवास बांडला यांनी केले आहे. तसेच कॉन्कॉरचे कार्यकारी संचालक (domestic and commercial) ए. वासुदेवा राव यांच्या कार्यालयाशी ०११ - ४१२२२५१८ या क्रमांकावर व vaasudevrao@concorindia.com या ई-मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. कोवीड-१९ पार्सल स्पेशल ट्रेन्स हॉर्टीकल्चर ट्रेनसह पार्सल सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, या सुविधेला ‘कोवीड-१९ पार्सल स्पेशल ट्रेन्स' नाव देण्यात आले असून, देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पाठविणे शक्य होणार आहे. या पार्सल सुविधेमार्फत देशातील दिल्ली, मुंबई, सुरत, कोलकत्ता, चेन्नई, हैद्राबाद, बेंगलोर, गुवाहटी, लुधियाना, भोपाळ अशा महत्त्वाच्या शहरांपर्यंत रेल्वेद्वारे शेतीमाल वाहतूक होणार असून, राज्यातील मनमाड, भुसावळ, नाशिक, नागपूर, गोंदीया, सेवाग्राम, अकोला, बडनेरा, जळगाव, पुणे, दौंड, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, मिरज, सातारा, नांदेड, पूर्णा या शहरातून सदर रेल्वे जाणार असल्याने, त्या भागातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, मोठे शेतकरी व व्यापारी इत्यादींचा शेतमाल, फळे, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ इत्यादी परराज्यात पाठविण्यास मदत होणार आहे. तसेच कोकण विभागातील शेतमाल मुंबई येथून देशातील प्रमुख शहरात पाठविणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, मोठे शेतकरी व व्यापारी यांनी सदर रेल्वे पार्सल सुविधेमार्फत राज्यातील शेतमाल इतर राज्यातील मोठ्या शहरात पाठविणेबाबत सदर रेल्वे पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक आणि राज्याचे पणन संचालक श्री. सुनील पवार यांनी केलेले आहे.  अधिक माहितीसाठी.... मध्य रेल्वे विभागातील चीफ कमर्शीअल मॅनेजर यांच्या ८८२८११०९५० व ८८२८११०९५३ तसेच पश्चिम रेल्वे विभागातील चीफ कमर्शीअल मॅनेजर यांच्या ९००४४९०९५० व ९००४४९०९५३ किंवा रेल्वे विभागाच्या १३८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करावा. सदरच्या पार्सल ट्रेनची यादी, त्यांचे वेळापत्रक पुढील लींकवर उपलब्ध आहे . https://enquiry.indianrail.gov.in/mntes/q?opt=TrainServiceSchedule&subOpt=show&trainNo=००११३ माहितीसाठी संकेतस्थळ पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर राज्यातील कांदा पुरवठाधारकांची यादी, पार्सल ट्रेनची यादी, त्यांचे वेळापत्रकाबाबतची लींक, राज्यातून जाणाऱ्या १७ पार्सल ट्रेन्सची सविस्तर माहिती, देशातील पणन मंडळांचे दूरध्वनी क्रमांक, रेल्वेतील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत पणन मंडळाच्या संकेतस्थळावर खालील माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

  • राज्यातील कांदा पुरवठाधारकांची माहिती
  • कोवीड-१९ पार्सल ट्रेन्सची लिंक
  • राज्यातून जाणाऱ्या १७ कोवीड-१९ पार्सल ट्रेन्सची सविस्तर माहिती
  • देशातील पणन मंडळाचे दूरध्वनी क्रमांक
  • रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com