चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाईची मागणी 

या हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.
चक्रीवादळामुळे नुकसान  झालेल्यांना भरपाईची मागणी  Hurricane damage Demand for compensation to those who have died
चक्रीवादळामुळे नुकसान  झालेल्यांना भरपाईची मागणी  Hurricane damage Demand for compensation to those who have died

वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली व विजेच्या ताराही तुटून पडल्या.  वडाळी देशमुख गावामधील पणज मुख्य मार्गावर सरपंच प्रवीण शिंगाडे यांच्या घराजवळील वडाचे जुने झाड पडले. झाडाखाली सोपान डवाले यांच्या दोन गाड्या होत्या, त्यांचे नुकसान झाले. कांद्यांचे भरलेले कट्टे गारीमुळे खराब झाले. गौरव सुभाष वैतकार यांच्या गोठ्यावरील टीन पत्रे उडाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य जगत गणेश वाहुरवाघ, संजय रामदास वाहुरवाघ, बाळाराम अर्जुन भाटे, प्रमिला देवराव आग्रे, निर्मला रामकृष्ण वारुळे, या मजूर वर्गाच्या राहत्या घरावरील टीन पत्रे उडून गेली. काहींचे घरांच्या मुख्य भिंती पडल्या आहेत. प्रशासनाने वडाळी देशमुख परिसरामधील फळबाग, शेतकरी व गावामधील मजुरांच्या घराचे नुकसानासाठी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण शिंगाडे यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com