वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा नदीत जलसमाधी आंदोलन 

महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा.
If power supply is not restored Jalasamadhi movement in Dhora river
If power supply is not restored Jalasamadhi movement in Dhora river

शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा, अन्यथा जोहरापूर (ता. शेवगाव) येथे नेवासे रस्त्यावरील गोदावरी नदीत गुरुवारी (ता. ९) रोजी शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे नायब तहसिलदार रमेश काथवटे यांना निवेदनाद्वारे दिला.  निवेदनात म्हटले आहे की, थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील कृषी पंपाचा १५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत केला आहे. अतिवृष्टी व पुराच्या संकटातून बाहेर पडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणने कोंडीत पकडले. राज्यातील इंदापूर, बारामती, नेवासे, कन्नडसह राज्यातील बहुतांशी तालुक्यात थकीत वीज बील न भरता वीजपुरवठा सुरळीत सुरू केला आहे.  तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी तयारी सुरू आहे. विहिरी व कुपनलिकांना मुबलक पाणी असताना महावितरणने वीज पुरवठा खंडीत केल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले. त्यामुळे पाणी असूनही कांदा, गहू, हरभरा, तुरी व इतर बागायती पिके हातून जाण्याचा मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने योग्य तोडगा काढून तालुक्यात इतर तालुक्यासारखा वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा, महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात गुरुवारी (ता. ९) रोजी जोहरापूर (ता. शेवगाव) येथील ढोरानदीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याची जबाबदारी महावितरणची राहील, असे संघटनांच्या कार्यकत्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर किसान सभेचे संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, शहराध्यक्ष भाऊ बैरागी, दीपक ढाकणे, संजय लांडे, आदित्य लांडे, आजिनाथ उगलमुगले, गणेश लांडे, नितीन लांडे, विनायक नांगरे, संजय पांडव, अजिनाथ हरवणे, माऊली कराड, अजय कराड, संदिप बडधे, मनोज बडधे यांच्या सह्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com