अकोला जिल्ह्यात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ

अकोला : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत एक लाख ४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.
 Increase in area under gram crop in Akola district
Increase in area under gram crop in Akola district

अकोला : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत  एक लाख ४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ९० टक्क्यांवर लागवड पोचली आहे. यंदा हरभऱ्याची सरासरीच्या अधिक पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात हरभऱ्याचे ७० हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर त्याची ८२ हजार ६८८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.  प्रामुख्याने तालुकानिहाय विचार करता खारपाण पट्‍ट्यात अकोट तालुक्यात  १५८२०, तेल्हारा १२७७५, बाळापूर ९५८५, पातूर ३७२०, अकोला १८२७६, बार्शीटाकळी ६५४०, मूर्तिजापूर १५९७२ क्षेत्रावर लागवड झाली आहे. अकोला तालुक्यात हरभऱ्याची लागवड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 

यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्रही वाढल्याचे दिसून येते. प्रामुख्याने अकोटमध्ये ३०० हेक्टरवर पेरणी झाली. याशिवाय उर्वरित सर्व तालुके मिळून ही लागवड ६५० हेक्टरवर पोचली. रब्बीत सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गव्हाची लागवडसुद्धा बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने पातूर तालुक्यात ४७००, अकोल्यात ३०५७, बार्शीटाकळी ३५१५, मूर्तीजापूरमध्ये २१०६, बाळापूरमध्ये १८२४, तेल्हारा तालुक्यात १११०, अकोट तालुक्यात ८५९ हेक्‍टरवर गव्हाची लागवड झाली.

जिल्ह्यात गव्हाचे ३८२९० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, प्रत्यक्षातील लागवड १७२५१ हेक्टरवर म्हणजेच ५० टक्क्यांच्या आत आहे. हरभऱ्याचे सर्वाधिक ७१ हजार ८०० हेक्टर पेरणी क्षेत्र  आहे. इतर रब्बी पिकांची केवळ ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरिपात सर्वच पिकांपासून शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागले आहे.

वातावरणात  अनपेक्षित बदल झाल्याचा फटका बसला. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, ही सर्वच पिके हातातून गेली. हक्काचे मानले जाणारे कपाशीचे पीकही आतबट्ट्याचा खेळ ठरला. ही उणीव भरून काढण्यासाठी  शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर भर दिला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com