अकोला जिल्ह्यात इंधन दर वाढीने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री

अकोला : ट्रॅक्टरची कामे, पेट्रोलवर चालणाऱ्या पंपाच्या फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. शिवाय शेतमाल वाहतुकीचेही दर वधारले आहेत.
 Increasing fuel prices in Akola district has cut the pockets of farmers
Increasing fuel prices in Akola district has cut the pockets of farmers

अकोला : गेल्या महिनाभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या भाववाढीचा शेतकऱ्यांना थेट फटका बसत आहे. शेतीत होत असलेला यांत्रिकिकरणाचा वापर आता महाग झाला.  ट्रॅक्टरची कामे, पेट्रोलवर चालणाऱ्या पंपाच्या फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. शिवाय शेतमाल वाहतुकीचेही दर वधारले आहेत.

अकोला जिल्ह्यात डिझेलचा दर  प्रतिलिटर ७८ रुपये ३३ पैसे इतका आहे. ३१ मे रोजी हा दर ६५ रुपये २५ पैसे होता, तर ३० जूनला ७७ रुपये ६२ पैसे एवढा झाला. म्हणजे महिनाभरात १२ रुपयांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा यात दोन रुपयांची वाढ झाली.  तर, पेट्रोलचा सध्याचा दर ८७ रुपये १४ पैसे इतका आहे. ३१ मे रोजी पेट्रोल ७६ रुपये ३२ पैसे लिटर होते. म्हणजेच पेट्रोलच्या दरात दीड महिन्यात  १० ते ११ रुपयांची वाढ झाली. 

यंदा बैल बाजार बंद असल्याने अनेकांना शेतीच्या कामासाठी बैलजोड्यांची खरेदी करता आली नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीतील बहुतांश कामे करण्यात आली. आताही पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे होत आहेत. पिके कुठे एक महिन्याची, तर कुठे १५ दिवसांची आहेत. या पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तणनाशक फवारणी सुरु आहे.

पेट्रोलवर चालणाऱ्या पंपाद्वारे तासाचा खर्च वाढला आहे. बाजारांमध्ये वाहतुक होणाऱ्या भाजीपाल्यांच्या वाहनांनीही भाड्यात वाढ केली आहे. हजार रुपयांना मिळणारे वाहन १३०० ते १४०० रुपये दराने मिळते आहे. म्हणजेच वाहतुकीचा खर्च ३०० ते ४०० रुपयांनी वाढला आहे.

सात एकर शेती आहे. तीन ट्रॅक्‍टर आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रॅक्टरचे काम बरेच कमी झाले. डिझेलचे दर पेट्रोलच्या बरोबरीने गेले आहेत. शेतकरी मात्र मागील वर्षाप्रमाणेच भाडे घेण्याचा आग्रह करतात. व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. नांगरणीपासून पेरणीपर्यंत सर्व कामे उधारीत  करावी लागली. डिझेलच्या भाववाढीचा फटका ट्रॅक्टर व्यावसायिकांनाही बसत आहे.               - अर्जुन खरात, ट्रॅक्टर मालक, पळसखेडा, जि. वाशीम

चार महिन्यांपासून बैल बाजार बंद असल्याने यंदा बैल विकत घेऊ शकलो नाही. परिणामी, नांगरणी व पेरणी ट्रॅक्‍टरने केली. डिझेलचे भाव वाढल्याचे कारण सांगून ट्रॅक्टरचे भाडे जास्त मागितले. सर्व ट्रॅक्टरधारकांनी एक सारखेच भाव केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. - राजू  ढगे, शेतकरी, भोकरखेडा, जि. वाशीम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com