नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा बेमुदत बंद

नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन महिन्यांपर्यंत रक्कम देत नाहीत. यामुळे सोमवारपासून बंद केलेल्या अडत्यांना बाजार समितीच्या संचालकाने अपशब्द वापरला. त्यामुळे अडत्यांचा बाजार बंद चिघळला आहे. अडत्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद करून तोडगा निघेपर्यंत बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा बेमुदत बंद
Indefinite closure of barriers against buyers in Nanded

नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन महिन्यांपर्यंत रक्कम देत नाहीत. यामुळे सोमवारपासून बंद केलेल्या अडत्यांना बाजार समितीच्या संचालकाने अपशब्द वापरला. त्यामुळे अडत्यांचा बाजार बंद चिघळला आहे. अडत्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद करून तोडगा निघेपर्यंत बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.

माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यामुळे मार्केटमधील वाद चिघळला. हळद खरेदीदार उशिरा पेमेंट देत असल्याने अडत्यांनी सोमवारपासून बीट व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर बाजार समिती सभापती संभाजी पुयड, उपसभापती पंजाब आढाव, माजी सभापती बी. आर. कदम, संचालक आनंद कपाटे, संजय लोणे, सचिव वामनराव पवार यांनी अडते व खरेदीदार यांची मार्केट कमिटीच्या सभागृहात बैठक बोलावली होती. मार्केट कमिटी पदाधिकाऱ्यांनी चांगली भूमिका घेत मध्यस्थी केली. बैठकीत दोन्ही बाजूंनी सविस्तर चर्चा झाली. कृषी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तोडगा काढत आठ ते दहा दिवसांत एक रुपये कपात करून व वीस दिवसांत पेमेंट द्यावे, असे सांगितले. 

व्यापारी प्रतिनिधी ओमप्रकाश पोकर्णा आले. त्यांनी सर्व अडत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत प्रवेश केला. काही जणांच्या अंगावर धावून जात अरेरावी केली, असा आरोप अडत्यांनी केला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.