सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र पथक

सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून अधिक आहे. त्यातील संस्था खासदार आणि काही आमदारांशी संबंधित आहेत. मार्चअखेर थकबाकी वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे वसुलीसाठी बँकने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र पथक
Independent team for recovery of arrears of Sangli District Bank

सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून अधिक आहे. त्यातील संस्था खासदार आणि काही आमदारांशी संबंधित आहेत. मार्चअखेर थकबाकी वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे वसुलीसाठी बँकने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले आहे.

जिल्हा बँकेच्या एनपीएची थकबाकी ६५० कोटींहून अधिक झाली आहे. वाढत्या एनपीएमुळे बँकेसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. थकबाकीदार असलेल्या निवडक ३० संस्थांची यादी निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरून ''व्हायरल झाली होती. या संस्था खासदार आणि काही आमदार, संचालकांशी संबंधित आहेत. बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार सहा बड्या संस्था लिलावात स्वतःच खरेदी केल्या आहेत; परंतु अद्याप त्या भाड्याने देण्याबाबत किंवा विक्री करण्याबाबत निर्णय झालेला नाही.

''नाबार्ड''च्या लेखापरीक्षणात थकबाकीबाबत आक्षेप नोंदवले आहेत. एनपीए वसुलीबाबत बँकेला सूचना केल्या आहेत. बँक प्रशासनासमोर आता वसुलीचे टार्गेट आहे. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत देखील थकबाकी वसुलीसाठी कडक भूमिका घेण्याचे ठरले आहे. बँकेचा कार्यभार हाती घेतल्याबरोबरच नूतन अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्चअखेर बड्या संस्थांची थकबाकी वसूल केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार तत्काळ हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.