कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी, असे आशयाचे निवेदन युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन
Intense agitation if agricultural power supply is cut off

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी, असे आशयाचे निवेदन युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.  खरीप हंगामात पावसाची संततधार असल्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकांना फटका बसला. उत्पादकता प्रभावित झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण गडबडले. पिकांच्या उत्पादन खर्चाची भरपाईदेखील झाली नाही. रब्बी हंगामात जमिनीत ओलावा कायम असल्याने त्याचा पिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. काही शेतकरी संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लोणी, कोठोडा, पिंपरी रिठे व अन्य काही गावांमध्ये थेट रोहित्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सिंचन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत याची दखल घेत बंद केलेले रोहित्र व शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणी त्वरित सुरळीत करावी व ही मोहीम थांबवावी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास वाढीव कालावधी द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाशन मारोटकर, शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय राणे, अमोल ढवस, सरपंच निखील मोरे, प्रतीक रिठे, दीपक घटाळे, प्रवीण खेडकर, नरेंद्र खडसे, भूषण ठाकरे, वैभव रिठे, आशिष हटवार, शुभम सावरकर, अजय काळे, अजय कुकडे, रूपेश उघडे, हरिदास लांजेवार, सतीश गभणे, उमेश लांजेवार, भारत तिरमारे, मनोज बनारसे, मंगेश कांबळे उपस्थित होते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com