कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास तीव्र आंदोलन

रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज वितरण कंपनीने वीज देयक वसुलीच्या नावावर वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याने हा प्रकार त्वरित थांबवावा,’’ अशी मागणी करण्यात आली आहे.
 कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास तीव्र आंदोलन
Intense agitation if power cut of agricultural pumps is not stopped

यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज वितरण कंपनीने वीज देयक वसुलीच्या नावावर वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याने हा प्रकार त्वरित थांबवावा,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मारेगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.  वातावरणातील बदलामुळे पावसाचे दिवस वाढीस लागले आहेत. गेल्या खरीप हंगामातदेखील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे संततधार पावसामुळे नुकसान झाले. कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकतादेखील घटली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर टाकली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, भाजीपाला आदी पिके पाण्याअभावी वाळत आहेत. ही पिकेही आता शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करू नये. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, नगरसेवक हेमंत नरांजे, शेख अब्दुल शेख चॉंद, दयाल रोगे, जिजा वरारकर, नागेश रायपुरे, नितीन वाढई, सुरेश महाकुलकर, विवेक मस्की, अतुल पचारे यांनी दिला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com