औरंगाबाद येथे १६ पासून आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबाद येथे बुधवार (ता. १६) ते शुक्रवार (ता. १८) दरम्यान नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १५) वाल्मी, औरंगाबाद येथे शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, केंद्रीय पाणीपुरवठा विभागाचे संचालक गिरिराज गोयल, केंद्रीय जल समितीचे संचालक अनुज कनवाल आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह व अन्य राज्यातील सुमारे १५० शेतकरी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचे उद्‍घाटन जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, राजेंद्र पवार उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय सिंचन व जलनिस्सारण परिषदेचे भारताचे उपाध्यक्ष डॉ. येल्लारेड्डी, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी कडवंची येथील पाणलोट क्षेत्रास भेट देण्यात येणार आहे.

या निमित्ताने सहभागी शेतकऱ्यांना या विषयाचे महत्त्व व त्यामधील अडचणींबाबतही मागदर्शन केले जाणार असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी दिली. कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांची राहण्याची व इतर व्यवस्था वाल्मी करणार आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांना १६ जानेवारीला आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com