जागतिक कापूस वापर वाढणार 

अमेरिकेच्या कृषी विभागाने (युएसडीए)ने जागतिक २०२१-२२च्या हंगामात कापूस उत्पादन आणि वापर वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर भारतात कापूस उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे.
जागतिक कापूस वापर वाढणार 
Jagtik Kapus Vapar Vadnar

पुणे ः अमेरिकेच्या कृषी विभागाने (युएसडीए)ने जागतिक २०२१-२२च्या हंगामात कापूस उत्पादन आणि वापर वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर भारतात कापूस उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे. तर चीन, पाकिस्तान आणि टर्कीत कापूस उत्पादन वापराच्या तुलनेत कमी राहणार आहे. त्यामुळे या देशांची कापूस आयात वाढणार असल्याचे युएसडीने म्हटले आहे.  जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात युएसडीएने जागतिक कापूस उत्पादन १ हजार २०९.६ लाख खंडी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. एक कापूस खंडी ४८० पाऊंडची म्हणजेच २१८ किलोची असते. तर जागतिक कापूस वापर १ हजार २४२.४ लाख खंडीवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत युएसडीएने जागतिक उत्पादनाचा अंदाज ६ लाख गाठींनी कमी केला आहे. चीन, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन वाढीचा अंदाज आहे. जागतिक कापूस उत्पादन आणि वापरात जवळपास अडीच टक्क्यांची तफावत आहे. तर मागील हंगामातील कापसाचा शिल्लक साठा ८८४.१ लाख खंडी होता. तर चालू हंगामात वापर वाढल्याने पुढील हंगामासाठी शिल्लक साठा ८५० लाख खंडी राहण्याचा अंदाज आहे.  अमेरिकेत मागील हंगामात १४६.१ लाख खंडी कापूस उत्पादन झाले होते, यंदा १७६.२ लाख खंडी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये यंदा २७० लाख खंडी कापूस उत्पादन होणार असून, वापर ३९५ लाख खंडीवर पोचणार आहे. चीनचा वापर यंदा ५ लाख खंडींनी कमी होण्याची शक्यता, युएसडीएने व्यक्त केली आहे. परंतु यंदा चीनच्या कापूस उत्पादन आणि वापरात २५ लाख खंडीची तफावत आहे. पाकिस्तानचा विचार करता उत्पादन ५८ लाख खंडीवर राहील तर वापर ११२ लाख खंडीचा होणार आहे. पाकिस्तानमध्ये उत्पादन आणि वापर यांच्यात ५४ लाख खंडींची तफावत असणार आहे. तर टर्किमध्ये उत्पादन ३८ लाख खंडींवर पोचण्याचा अंदाज असून, वापर ८५ लाख खंडींचा होईल. येथे ४७ लाख खंडीची तफावत असणार आहे. बांगलादेशमध्ये कापूस वापर १.५ लाख खंडीचे होणार असून, वापर ८८ लाख खंडीवर होणार आहे.  भारतात उत्पादन घटले  भारताचा विचार करता युएसडीएने मागील हंगामातील शिल्लक साठा १३४.४ लाख खंडींचा गृहीत धरला आहे. एक खंडी २१८ किलो कापसाची असते. तर उत्पादन यंदा २७५ लाख खंडींवर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर वापर २६० लाख गाठींचा होईल. तर १०१ लाख गाठी कापूस पुढील हंगामासाठी शिल्लक राहील, असे युएसडीएने म्हटले आहे.  अमेरिकेची निर्यात कमी होणार  अमेरिकेचा विचार करता उत्पादन १७६ लाख गाठींवर पोहचेल. तर वापर २५.५ लाख गाठींवर स्थिरावेल, असे युएसडीएने म्हटले आहे. मागील वर्षी अमेरिकाचा कापूस निर्यात १६३.७ लाख खंडींवर झाला होता. तर यंदा कापूस निर्यात १५० लाख खंडीवर राहण्याचा अंदाज आहे. तर अमेरिकेच्या कापसाचा हंगामातील दर किमान ९० सेंट प्रति पाऊंड राहील, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.