कडबा कटर यंत्र मिळणार ५० टक्के अनुदानावर 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प (एनडीडीबी), राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबा कटर यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
Kadaba cutter machine will be available on 50% subsidy
Kadaba cutter machine will be available on 50% subsidy

बुलडाणा : जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा, चारा वाया जावू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प (एनडीडीबी), राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबा कटर यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. 

या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत डीबीटीनुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कटर यंत्र खरेदी करावे. 

त्याचे जीएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करून त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खात्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा.

या यंत्राद्वारे चारा कापणी केल्यामुळे चारा वाया जात नाही. चाऱ्यावरील खर्च कमी होतो व चाऱ्याची पौष्टिकता वाढून दुधातील फॅट, एसएनएफ वाढण्यास मदत होते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. तरी जास्तीत जास्त पशुपालकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com