सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे काणाडोळा

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे वर्षानुवर्षे थकीत आहेत. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बँकेच्या एनपीएत वाढ झाली आहे.
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे काणाडोळा
Keep an eye on the recovery of large arrears of Sangli District Bank

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे वर्षानुवर्षे थकीत आहेत. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बँकेच्या एनपीएत वाढ झाली आहे. थकीत कर्जे, वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी नाबार्डने ताशेरे ओढले. त्याबाबतची दखल घेत बँकेने टॉप ३० थकबाकीदार संस्थांची यादी तयार केली आहे. बँकेने मार्चअखेरपर्यंत बड्या संस्थांकडील थकबाकी वसुलीचा निर्णय घेतला आहे. मात्र वसुलीकडे बॅंकेचा काणाडोळा होत आहे. 

जिल्हा बँकेतर्फे शेतीसह बिगरशेती, सहकारी संस्थांसाठी कर्जपुरवठा होतो. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शेतीचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेचे अर्थचक्रही रुतत आहे. फटकाही बसतोय. बँकेने साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था, अन्य उद्योगांना देण्यात आलेली कर्जाची रक्कम सुमारे १ हजार १०० कोटीवर आहे. बँकेच्या बड्या थकबाकीदार संस्था आहेत. यामुळे बॅंक एनपीएमध्ये काही वर्षापासून भर पडली. सध्या हा आकडा ६५० कोटींवर आहे. थकबाकीत आमदार, खासदारांसह बड्या संस्थांचा समावेश आहे. वाढत्या एनपीएमुळे बँकेचे आर्थिक गणित अडचणीत येत आहे.

नाबार्डनेही लेखापरीक्षण अहवालात आक्षेप घेत एनपीए वसुलीबाबत बँकेला सूचना केल्या आहेत. बँक प्रशासनानेही याबाबत गांभीर्याने घेतले आहे. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीमध्येही वसुलीबाबत कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार बँकेने टॉप थर्टी संस्थांकडील वसुली करण्यासाठी सुरुवात केली. त्यांच्यापुढे मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे.

बँकेने चुकीच्या पद्धतीने बड्यांच्या संस्थांना कर्जाचे वाटप केले. संबंधित संस्था चालकांच्या चुकांमुळे सध्या या संस्था बंद आहेत. बँकेने या संस्था ताब्यात घेतल्या. तरी थकबाकी वाढत आहे. या संस्था लिलाव करून थकबाकी वसुली करण्याबाबत बँकेने निर्णय घेतला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.