खडकवासला, कलमोडी धरण भरले

खडकवासला धरण
खडकवासला धरण

पुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून, धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये जवळपास ८२ टीएमसी (३८ टक्के) पाणी साठा झाला आहे.

खडकवासला, कलमोडी धरण १०० टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. खडकवासला धरणातून हंगामात प्रथमच १९ हजार क्युसेक तर कलमोडीतून ४७०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. खडकवासला धरण यंदा हंगामात प्रथमच ओव्हरफ्लो झाले असून, सकाळी आठ वाजता धरणातून नदीपात्रात १७०० क्युसेक तर कालव्यात १००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरवात झाली. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी सहा वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून मुठा नदीपात्रात आणि कालव्यात सुमारे २० हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. खडकवासला १०० टक्के भरले (Video)

कलमोडी धरणातून आरळा नदीपात्रात ४७०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडज धरणातून मीना नदीमध्ये २३६६, वडीवळे धरणातून इंद्रायणी नदीत सुमारे चार हजार तर गुंजवणी धरणातून ६६२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते.  वडज, चासकमान, भामाअसखेड, भाटघर धरणात ५० तर वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, गुंजवणी या धरणांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.

सोमवारी (ता.१६) जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पडलेला पाऊस (मिमी) : टेमघर १०७, वरसगाव ८९, पानशेत ९०, खडकवासला २७, पवना १५४, कासारसाई ३२, मुळशी ११६, कलमोडी ७०, चासकमान ४२, भामा असखेड २५, आंद्रा ६०, वडीवळे १०२, गुंजवणी ४२, भाटघर ३२, निरा देवघर ९२, वीर ६, नाझरे १, पिंपळगाव जोगे ४९, माणिकडोह ६०, येडगाव ५२, वडज ४२, डिंभे ६०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com