खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध लाक्षणिक उपोषण 

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक गैरकारभाराबाबत नंदलाल भट्टड यांनी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती गठित केली आहे.
 खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध लाक्षणिक उपोषण  Of Khamgaon Market Committee Symbolic fast against stewardship
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध लाक्षणिक उपोषण  Of Khamgaon Market Committee Symbolic fast against stewardship

बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक गैरकारभाराबाबत नंदलाल भट्टड यांनी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती गठित केली आहे. चौकशीमध्ये तक्रारीत सत्यता आढळून आलेली आहे. पुर्तता अहवालाबाबत वरिष्ठांच्या आदेशाला बाजार समिती गांभीर्याने घेत नसल्याने तक्रारदार नंदलाल भट्टड यांनी बुधवारी (ता.२८) येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.  भट्टड यांनी १० जुलैला संबंधितांना पत्र देऊन लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. शासनाने २०१६-१७मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान जाहीर केले होते. मात्र बाजार समितीच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या गैरकारभारामुळे अनेक शेतकरी सदर योजनेपासून वंचित राहिले आहेत. विनापरवाना अडत चालविणे, हिशोबपट्टी कमी दराची व बिले जास्त दराचे, अनेक हिशोबपट्ट्यांची बिले नाहीत, असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. बाजार समितीतून कोट्यवधी रुपयांचा माल विना गेटपास व विना बिलाचा बाहेर कशा पद्धतीने जातो. ज्याचा सेस सुद्धा बाजार समितीला प्राप्त होत नाही. बाजार समिती बाबतीत चौकशी होऊन कार्यवाहीचे आदेश आल्यानंतरही सदर प्रकरण राजकीय दबावातून दाबले जात आहे, असा आरोप भट्टड यांनी केला आहे.  अकोट बाजार समितीचे सचिव निलंबित अकोट, जि. अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. बाजार समितीत आर्थिक अनियमिततेचा ठपका माळवे व लेखापाल मंगेश बोंद्रे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आला असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. प्रशासक राजेंद्र पालेकर यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे. बाजार समितीमध्ये हिशेब ठेवणे, देखरेख तसेच नियंत्रणात्मक कामाकडे माळवे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत प्रशासकीय कामे बिनचूक करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु ती जबाबदारी पार पाडण्यास कसूर केल्यामुळे प्रशासकीय कार्यवाही करून विभागीय चौकशी करणे क्रमप्राप्त झाल्याचे म्हटले आहे. माळवे यांना निलंबित करून निलंबन कालावधीत चोहोट्टा बाजार येथील उपबाजार समिती कार्यालयात दैनंदिनरीत्या उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com