कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प

कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प

कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्वच दूध संघांनी संकलन बंद ठेवल्याने कुठेच दुधाचे संकलन झाले नाही. पहाटेपासून गावोगावच्या गजबजणाऱ्या दूध संस्था शांत होत्या. अनेक ठिकाणी दुग्ध संस्थां सुरूही केल्या गेल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेऊन आंदोलनात सहभाग दर्शविला.

सोमवारी दिवसभर हिंसक आंदोलन झाले नसले तरी रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी टॅंकर अडवून दुधाची वाहतूक बंद पाडली. यामुळे रात्रभर तणाव होता. सोमवारी सकाळी दुधाचे संकलनच झाले नसल्याने दूध अडविण्याच्या घटना घडल्या नाहीत. सुमारे पंधरा लाखांहून अधिक लिटर दुधाचे संकलन सोमवारी झाले नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले. रविवारी सायंकाळी संकलीत झालेल्या गोकुळ दूध संघांचे टॅंकर सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात पुणे, मुंबईकडे रवाना करण्यात आले.

आजचा दिवस महत्त्वाचा दूध दर आंदोलन बेमुदत आहे. यामुळे या आंदोलनाचा आजचा (मंगळवार)चा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. संघांनी स्वयंस्फूर्तीने दूध संकलन बंद ठेवल्याचे वादाचे प्रसंग घडले नाहीत. पण संघानी फक्त एक दिवस दूध बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. यामुळे अनेक दूध संघांनी मंगळवारी दूध संकलन बंद ठेवणार की, सुरू ठेवणार याबाबतचा निश्‍चित निर्णय सांगण्यास नकार दिला. यामुळे मंगळवारी संघांच्या भूमिकेवर आंदोलनाची तीव्रता ठरणार आहे. दरम्यान, शहरी भागातील नागरिकांनी संभाव्य दूध टंचाई लक्षात घेऊन पॅकबंद पिशव्यामधून येणाऱ्या दुधाचा जादा खरेदी करून ठेवली. शहरी भागातील नागरिकांना आज (मंगळवारी) दुधाची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com