‘कसबा सांगाव’ची गाय; ‘गडहिंग्‍लज’च्या म्‍हशीने मारली बाजी; ‘गोकुळ श्री’ स्पर्धेा

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ)वतीने घेण्यात आलेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत गडहिंग्लजच्या लक्ष्‍मी विकास सेवा संस्थेच्या म्‍हैसपालक शेतकरी सौ. वंदना जरळी यांच्‍या गुजरीन नावाच्या जाफराबादी
‘कसबा सांगाव’ची गाय;  ‘गडहिंग्‍लज’च्या म्‍हशीने मारली बाजी; ‘गोकुळ श्री’ स्पर्धेा
‘कसबा सांगाव’ची गाय; ‘गडहिंग्‍लज’च्या म्‍हशीने मारली बाजी; ‘गोकुळ श्री’ स्पर्धेा

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ)वतीने घेण्यात आलेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत गडहिंग्लजच्या लक्ष्‍मी विकास सेवा संस्थेच्या म्‍हैसपालक शेतकरी सौ. वंदना जरळी यांच्‍या गुजरीन नावाच्या जाफराबादी  म्‍हशीने एका दिवसात १९.५४० लि. दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला, तर गायीमध्‍ये कसबा सांगाव येथील जनसेवा सह. दूध संस्थेचे गायपालक शेतकरी  किरण चौगले यांच्‍या टारझन नावाच्या एचएफ गायीने ३७.२१५ लि. दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला. दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देण्यासाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हशीकरिता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेण्यात येते. २०२०-२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ७८ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी भाग घेतला.  चिखली (ता. कागल) येथील हरहर महादेव संस्थेच्या अमर यशवंत पाटील यांच्या म्हशीने १९.१३० लिटर दूध देत दुसरा क्रमांक मिळवला. सौ. जरळी यांच्या म्हशीने १९.०१  दूध देत तिसरा क्रमांक मिळवला. गायीमध्ये माणगाव (ता. हातकणंगले) अमोल मगदूम यांच्या गायीने ३४.८० लिटर दूध देत दुसरा, तर व्‍हनगुती  (ता.भुदरगड) येथील अनिकेत  पाटील यांच्या गायीने ३२.३५ लिटर दूध देत तिसरा क्रमांक पटकावला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com