कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे आंदोलन

कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा वापरणाऱ्या व्यापारी नीलेश पटेल याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डमधील मुख्य कार्यालयावर मंगळवारी (ता. ४) धडक देण्यात आली.
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे आंदोलन
In Kolhapur Market Committee Movement on behalf of Shiv Sena

कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा वापरणाऱ्या व्यापारी नीलेश पटेल याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डमधील मुख्य कार्यालयावर मंगळवारी (ता. ४) धडक देण्यात आली. कर्नाटकातील गुळाची आवक बंद करा, असे सांगत पटेल याचा परवाना रद्द करण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्याच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही दिली. 

या वेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, ‘‘गूळ तपासणीसाठी नेमलेले सदस्य काय करतात? कर्नाटकातून गूळ येतोच कसा? राजर्षी छत्रपती शाहू महाराज ब्रँडने तो गूळ विकला जातो, हे दुर्दैव आहे. हा अवमान खपवून घेतला जाणार नाही. यासाठी कारणीभूत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? बंदुकीची भाषा करणाऱ्या पटेलची धमकी खपवून घेतली जाणार नाही. त्याला शिवसेनेच्या ताब्यात द्या. तसेच कर्नाटकातून होणारी गुळाची आवक थांबवा.’’ 

तानाजी आंग्रे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या १२०० वरून ३०० झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत वाईट अवस्थेत जगत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मूठभर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बदनाम केली आहे.’’

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, ‘‘समितीच्या संचालकपदी काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तीन कार्यक्रमांसाठी एक कोटी रुपये खर्च होत असल्याचे लक्षात आले. तो तातडीने बंद केला. बैठकीसाठी असणाऱ्या भत्त्याला हात लावलेला नाही. राजर्षी शाहू गूळ जीआय मानांकनाचा व्हावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. गुळाला हमीभाव मिळण्यासाठी आता संघर्ष करुया.’’

शिष्टमंडळात विजय देवणे, सुजित चव्हाण, अशोक डवंग, विवेक काटकर, राजू यादव, भारत भापकर, सरदार पोवार, प्रशांत नाळे, जालिंदर माने, कृष्णात पोवार, विनोद खोत, राजू यादव, विराज पाटील आदींचा समावेश होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.