संक्रांतीतही कोल्हापुरी  गुळाला दराचा गोडवा नाहीच

देशभरात संक्रातीचा सण उत्साहात साजरा होत असला, तरी यंदा कोल्हापुरी गुळासाठी मात्र गुळाचा गोडवा राहिला नाही. गुजरातमधील शीतगृहात सातत्याने कोल्हापूरपेक्षा कर्नाटकातील गूळ जात असल्याने यंदा गेल्या वर्षीपेक्षा कोल्हापुरी गुळाला मागणी कमी राहिली आहे.
 संक्रांतीतही कोल्हापुरी  गुळाला दराचा गोडवा नाहीच
Kolhapuri in Sankranti too Jaggery is not sweet at all

कोल्हापूर : देशभरात संक्रातीचा सण उत्साहात साजरा होत असला, तरी यंदा कोल्हापुरी गुळासाठी मात्र गुळाचा गोडवा राहिला नाही. गुजरातमधील शीतगृहात सातत्याने कोल्हापूरपेक्षा कर्नाटकातील गूळ जात असल्याने यंदा गेल्या वर्षीपेक्षा कोल्हापुरी गुळाला मागणी कमी राहिली आहे. त्यामुळे ऐन संक्रातीच्या कालावधीमध्ये ही कोल्हापुरी गुळाचे दर फारसे वाढले नाहीत.

संक्रांतीच्या दरम्यान प्रत्येक वर्षी गुळाला क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपये दराची वाढ होते. या दरम्यान देशभरातून गुळाला मागणी वाढत असल्याने कोल्हापुरी गुळाला गुजरातमधून जास्तीत जास्त मागणी असते. यंदा मात्र परिस्थिती उलटी आहे. गेल्या वर्षीपेक्षा कर्नाटकामध्ये गुळाचे उत्पादन जादा प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटकातील गूळ व्यापाऱ्यांना स्वस्त पडत असल्याने गुजरातेतील व्यापारी कर्नाटकातून गूळ थेट गुजरातमध्ये मागवत आहेत.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातेतील व्यापाऱ्यांना कर्नाटकातील गूळ कोल्हापूरपेक्षा क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी स्वस्त पडतो. परिणामी, यंदा येथील व्यापाऱ्यांनी कर्नाटकातूनच गूळ घेण्यास प्रारंभ केला. गुळाचे जादा उत्पादन झाल्यामुळे त्या भागातील दरही कमी आहेत. गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक व दर दोन्ही स्वस्त पडत असल्याने गुजरातमधून कर्नाटकी गुळाला सातत्याने मागणी वाढत राहिली याचा फटका कोल्हापुरी गुळाला बसला आहे.

येथील बाजारपेठेत गेल्या वर्षीपेक्षा गुळाचे दर क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी कमी असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. जानेवारीच्या पूर्वार्धात संक्रातीमुळे दरात चांगली वाढ होईल, अशी शक्यता होती. परंतु गुजरातमध्ये कर्नाटकी गुळाच्या आवकेमुळे कोल्हापुरी गुळाच्या दरात अपेक्षित उठाव झालाच नाही.त्यामुळेच येथील गूळ उत्पादकांना फटका बसल्याचे गुळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतवारीनुसार  गुळास मिळणारा दर (क्विंटल, १२ जानेवारीची स्थिती) प्रत    दर (सरासरी) स्पेशल    ४४०० एक    ४१२५ दोन    ३८५० तीन    ३५०० चार    ३०५०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.