वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूर

मुंबई : राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था आणि पथदिव्यांचे वीजबिल, पाणी योजनांच्या थकबाकीवरून आता महाविकास आघाडीत कुरबूर सुरू झाली आहे. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे. वसुलीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूर
Kurbur in Mahavikas Aghadi due to electricity bill arrears

मुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था आणि पथदिव्यांचे वीजबिल, पाणी योजनांच्या थकबाकीवरून आता महाविकास आघाडीत कुरबूर सुरू झाली आहे. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे. वसुलीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. कृषी पंप ग्राहकांचे जोड खंडित करण्यास सुरवात केल्यानंतर सरकारकडील थकबाकीसाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. तर बिले दुरुस्त झाल्याशिवाय आम्ही रक्कम भरणार नाही, असा पवित्रा ग्रामविकास विभागाने घेतला आहे. 

महावितरण थकबाकी आणि केंद्र सरकारने कमी केलेली कर्जमर्यादा अशा कात्रीत अडकले आहे. कृषी वीज पंपांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण आक्रमक झाली आहे. तोच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक पथदिवे आणि व्यापारी सवलतीचे अनुदान यांच्याकडील थकबाकी ही सरकारी पातळीवरील आहे. ही थकबाकी वसूल होता होत नाही. परिणामी, ऊर्जामंत्री राऊत यांनी आपल्याच सहकारी पक्षांतील मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अप्रत्यक्षरीत्या तक्रार केल्याने पुढील काळात काय होते, हे पहावे लागेल. 

मागील आठवड्यात ग्रामपंचायतींचे पथदिवे, नगरविकासकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत पाणीबिलासंदर्भात ऊर्जामंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मात्र या तीनही बिलांची पुनर्तपासणी सुरू आहे. ही बिले दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही बिल भरू.  - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री.

गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा तुटवडा सुरू आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे, पण काही अडचणी आहेत. दिवस-रात्र थर्बलची वीज पुरवठा करायचा असेल, तर पैशांची गरज आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडूनही ग्रामविकास आणि नगरविकास खात्याकडून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे नाइलाजाने मुख्यमंत्र्यांकडे हा विषय न्यावा लागला.

- नितीन राऊत, ऊर्जामंत्री.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.